जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मोटरसायकल आहे की सुपरकार? गाडीला पाहून लोक झाले कन्फ्युज

मोटरसायकल आहे की सुपरकार? गाडीला पाहून लोक झाले कन्फ्युज

व्हिडीओ

व्हिडीओ

आपण प्रवास करण्यासाठी स्वतःसाठी अनेक प्रकारची वाहने घेत असतो. मार्केटमध्ये तर एकापेक्षा एक हटके गाड्या पहायला मिळतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 6 मार्च : आपण प्रवास करण्यासाठी स्वतःसाठी अनेक प्रकारची वाहने घेत असतो. मार्केटमध्ये तर एकापेक्षा एक हटके गाड्या पहायला मिळतात. अनेक मोठ मोठ्या कंपन्यांपासून तर अनेक जुगाडू गाड्याही चर्चेत असतात. सोशल मीडियावर नव्या आणि हटके गाड्यांचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. अशाच एका गाडीची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या गाडीचा व्हिडीओ पाहून लोकही थक्क झाले आहेत. डिजिटल कंटेंट क्रिएटर प्रियांका कोचरने नुकताच हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. प्रियांकाने सांगितले की, अलीकडेच तिने या खास वाहनातून प्रवास केला. तिने तिचा अनुभवही नेटकऱ्यांसोबत शेअर केला. हेही वाचा -  डझनभर मगरींनी मिळून झेब्रावर केला हल्ला, धक्कादायक घटनेचा Video Viral व्हिडिओमध्ये प्रियांका सुपरकारसारखी दिसणारी स्पेशल मोटरसायकल चालवताना दिसत आहे. तुम्हीही गाडी पाहून आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओ शेअर करत प्रियांकाने लिहिले की, तुम्ही गाडीची राईड करणार की चालवणार? व्हिडिओ क्लिपमध्ये ती सुरुवातीला ती वाहनाभोवती जमलेल्या काही लोकांशी संवाद साधताना दिसत आहे. ती लोकांना विचारते की ही कार किंवा सुपरकार किती लोकांना वाटते? बहुतेक लोक याला सुपरकार म्हणतात. मग जेव्हा तिने सांगितले की नाही, ही कार नाही, ती मोटरसायकल आहे, तेव्हाही लोक त्यावर विश्वास ठेवण्यास नकार देतात.

जाहिरात

कोचरने लोकांना सांगितले की ती प्रत्यक्षात पोलारिस स्लिंगशॉट आर बाईक आहे जी तीन चाकांवर चालते. गाडीला दरवाजे किंवा बाजूच्या खिडक्या नाहीत. संपूर्ण आतील भाग वॉटरप्रुफ आहे. जर पाणी पडले तर छिद्रांमधून निघून जातं. टायर खूप रुंद आहेत जे चांगली पकड देतात, त्यामुळे वेग चांगला राहतो.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडिओ पोस्ट केल्यापासून एकहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओला जवळपास 1.6 लाख लाईक्स मिळाले आहेत. भरपूर कमेंट देखील व्हिडीओवर येत आहेत. अनेक युजर्सनी कमेंट करत लिहिलं, मोटर-ट्रायसायकल, उलटी रिक्षा वाटतेय, एवढी सुंदर गाडी कुठे मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात