नवी दिल्ली, 6 मार्च : सोशल मीडियावर प्राण्यांचे भरपूर व्हिडीओ व्हायरल झालेले पहायला मिळतात. दिवसाला प्राण्यांच्या हल्ल्यांचा एक तरी व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसून येतो. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली असून सध्या डझनभर मगरींनी झेब्रावर हल्ला केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. मगर हा पाण्यातील धोकादायक प्राणी आहे. मगर जमीनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी धोकायक आढळून येते. मगरींनी हल्ला केल्यानंतर क्वचितच कोणी जीवंत राहतं. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये डझनभर मगरींनी झेब्राला आपल्या कचाट्यात पकडलं आणि आपला शिकार बनवलं.
व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की, झेब्रांचा कळप एक नदीमध्ये उतरुन पाण्याचा आनंद घेत आहे. अचानक नदीतून डझनभर मगरींचा कळप येतो आणि एका झेब्रावर हल्ला करतात. सर्व मगरी झेब्र्याला सर्व बाजूंनी चावा घ्यायला सुरुवात करतात. हे पाहून इतर झेब्रा तेथून धूम ठोकतात. मात्र मगरींच्या ताब्यात सापडलेल्या झेब्राचे वाईट हाल पहायला मिळतात. झेब्रानेही आपल्या मृत्यूला पत्करलेलं व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय. कारण तो स्वतःच्या बचावासाठी काही हालचाल करत नाही.
animals.energy नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ खूप कमेंटचा वर्षाव होत आहे. शिकारीचा थरारक व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसला असेल. व्हिडीओला लाईक्सही भरपूर मिळाले आहेत. यापूर्वी मगरींच्या हल्ल्याचे असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.

)







