मराठी बातम्या /बातम्या /Viral /OMG! जाळ्यात अडकलेला विचित्र मासा पाहून मच्छिमारही शॉक; पाहून तुम्ही सांगा कोण आहे हा?

OMG! जाळ्यात अडकलेला विचित्र मासा पाहून मच्छिमारही शॉक; पाहून तुम्ही सांगा कोण आहे हा?

एखाद्या भागातली पर्यावरणाची स्थिती आणि तिथल्या हवामानानुसार त्या त्या भागात वेगवेगळे प्राणी, पक्षी व त्यांच्या प्रजाती आढळतात. जगभरात माशांचेहीअनेक प्रकार आहेत; पण सर्वच प्रकारचे मासे सर्वच ठिकाणी सापडत नाहीत.

एखाद्या भागातली पर्यावरणाची स्थिती आणि तिथल्या हवामानानुसार त्या त्या भागात वेगवेगळे प्राणी, पक्षी व त्यांच्या प्रजाती आढळतात. जगभरात माशांचेहीअनेक प्रकार आहेत; पण सर्वच प्रकारचे मासे सर्वच ठिकाणी सापडत नाहीत.

एखाद्या भागातली पर्यावरणाची स्थिती आणि तिथल्या हवामानानुसार त्या त्या भागात वेगवेगळे प्राणी, पक्षी व त्यांच्या प्रजाती आढळतात. जगभरात माशांचेहीअनेक प्रकार आहेत; पण सर्वच प्रकारचे मासे सर्वच ठिकाणी सापडत नाहीत.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Maharashtra, India

  मुंबई, 22 सप्टेंबर-   एखाद्या भागातली पर्यावरणाची स्थिती आणि तिथल्या हवामानानुसार त्या त्या भागात वेगवेगळे प्राणी, पक्षी व त्यांच्या प्रजाती आढळतात. जगभरात माशांचेहीअनेक प्रकार आहेत; पण सर्वच प्रकारचे मासे सर्वच ठिकाणी सापडत नाहीत. हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे बिहारमध्ये घडलेली एक घटना आहे. बिहारमध्ये बगहा येथे मच्छिमारांच्या जाळ्यात एक असा विचित्र मासा अडकला आहे, की त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली. बुधवारी (21 सप्टेंबर 2022) बगहा-1 परिसरातल्या बनचहरी गावात हरहा नदीत मच्छिमार मासे पकडत होते. त्या वेळी सापडलेला मासा पाहून मच्छिमारांसह नागरिकही आश्चर्यचकित झाले. या संदर्भातलं वृत्त 'आज तक'ने प्रसिद्ध केलं आहे.

  आता हा मासा नागरिकांच्या कुतूहलाचा विषय बनला आहे. कारण या माशाला चार डोळे असून त्याचा रंग आणि आकार दोन्ही सर्वसामान्य माशांपेक्षा वेगळं आहेत. काळ्या रंगाच्या या माशाच्या शरीरावर गोलाकार पद्धतीचं डिझाइन आहे. या माशाबद्दल माहिती देताना वाल्मिकी टायगर रिझर्व्हमध्ये तैनात असलेले बंकेलाल प्रजापती आणि वरिष्ठ व्यवस्थापक कमलेश मौर्य यांनी सांगितलं, की, ‘हा मासा अ‍ॅमेझॉन नदीत आढळतो. याला Amazon Smell Exotic Cat Feet म्हणून ओळखले जाते. हा मासा आर्मर्ड कॅटफिश कुटुंबातला आहे. हा मासा आपल्या नद्यांमध्ये सापडणं ही चिंतेची बाब आहे.’ दरम्यान, हा मासा अ‍ॅमेझॉनवरून इथे पोहोचण्याबाबत ते म्हणाले, ‘अनेक जण हा मासा घरातल्या फिश टँकमध्ये पाळतात, तो काचेवरचे जंतू आणि माशांची घाण साफ करतो.’

  यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये बनारस आणि बिहारमधल्या कहलगावमध्येही अशा प्रकारचे मासे सापडले आहेत. अशा प्रकारचे मासे सापडणं ही आपल्या नद्यांसाठी चिंतेची बाब आहे. कमलेश मौर्य यांनी सांगितलं, की इथून 15,000 किलोमीटर दूर असलेल्या अ‍ॅमेझॉन नदीमध्ये राहणारा हा मासा आपल्या देशातल्या अशा लहान नद्यांमध्ये सापडणं हा संशोधनाचा विषय आहे.

  (हे वाचा:OMG! छोट्याशा कोळीने 20 पट मोठ्या पक्ष्याची केली शिकार; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO )

  हा मासा इथे कसा पोहोचला किंवा त्यामागची कारणं काय, हा नक्कीच संशोधनाचा विषय आहे. परंतु सध्या हा विचित्र दिसणारा मासा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. एखाद्या ठिकाणी नेहमी आढळत नसलेली प्रजाती अचानक तिथे वास्तव्य करू लागली, तर तिथे आधीच असलेल्या जैवविविधतेसाठी धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच यावर संशोधन होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

  First published:

  Tags: Bihar, Fish, Photo viral, Viral