मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अंगावर काटा येईल हा VIDEO पाहून! धावत्या कारमध्ये तरुण करत होता जीवघेणे स्टंट

अंगावर काटा येईल हा VIDEO पाहून! धावत्या कारमध्ये तरुण करत होता जीवघेणे स्टंट

धावत्या कारच्या खिडकीतून (Window of car) पूर्ण शरीर बाहेर काढत आणि हेलपाटत कारमधून प्रवास करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे.

  • Published by:  desk news

जयपूर, 22 जुलै : धावत्या कारच्या खिडकीतून (Window of car) पूर्ण शरीर बाहेर काढत आणि हेलपाटत कारमधून प्रवास करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे. एखाद्या समारंभातून मद्यप्राशन करून हे तरूण घऱी चालले (Drunk) असावेत, असा अंदाज आहे. कुठल्याही क्षणी जीवघेणा अपघात असून त्यातील एखाद्या तरुणाच्या जिवाला मोठा धोका निर्माण होऊ शकला असता, हे व्हिडिओ पाहताना लक्षात येतं." isDesktop="true" id="582960" >

व्हिडिओत सुरुवातीला एका कारच्या काचेतून अर्धांग बाहेर काढलेले तरुण चित्रविचित्र हातवारे करत संगीताच्या तालावर थिरकताना दिसतात. गाडीचा चालक मुद्दाम गाडीच्या स्टेअरिंगला हेलकावे देत गाडी हलवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं. त्याच्या धक्क्याने गाडी हलत असल्यामुळे गाडीच्या काचांमधून बाहेर झुकलेले तरुण अधिकच भेलकांडत असल्याचं दिसतं.

काही वेळाने तर दोन गाड्या एकमेकांपासून सुरक्षित अंतर न राखता एकमेकांना अक्षरशः घासून चालत असल्याचं दिसतं. थोडी जरी नजरचूक झाली असती, तरी मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळालं असतं, हे हा व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येतं. मात्र हे तरुण रिकाम्या रस्त्यावरून सुसाट वेगाने गाडी चालवत स्टंट करत असल्याचं चित्र दिसतं.

पोलिसांनी अशा प्रकारांना आळा घालून स्टंटबाजी करणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचं मत सामान्यांकडून व्यक्त होत आहे. अशा स्टंटबाजीमुळे या स्वतः या स्टंटबाजांच्या जीवाला तर धोका निर्माण होतोच, मात्र इतरांच्या जिवालाही त्यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

First published:

Tags: Stunt video, Video viral, Viral video.