लखेश्वर यादव, प्रतिनिधी जांजगीर चांपा, 14 जून : जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून, लहानशा भांडणातून प्रेयसीची हत्या अशा बातम्या सर्रास कानावर पडतात. केवळ माणसा-माणसांतच जीवघेणं, टोकाचं भांडण होतं, असं आपल्याला वाटतं. माणसं अमानुषपणे वागतातच, परंतु प्राणीही एकमेकांचा जीव घेतात. म्हणजे मांजराने उंदराला खाल्लं असं नाही, तर अस्वलाने अस्वलाला मारलं अशी घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात दोन अस्वलांमध्ये झालेल्या रक्तरंजित लढाईत एका मादी अस्वलाचा मृत्यू झाला आहे. बालोद जिल्ह्यातील नर्रा गावालगत असलेल्या जंगलात मादी अस्वलाचा मृतदेह सापडला. वनविभागाच्या पथकाने या मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार केले. यावेळी वन, पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
मंगळवारी याबाबत माहिती देताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नर्रा गावालगतच्या जंगलात मादी अस्वलाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह पाहिल्यानंतर नर आणि मादी अस्वलामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची भीती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, मृत अस्वलाचं वय सुमारे दीड वर्ष असल्याचं वनाधिकाऱ्यांनी सांगितलं. तिच्या पार्थिवावर करहीभदर वन डेपोत अंत्यसंस्कार करण्यात आले. मिथुन यांना ‘त्या’ एका कारणासाठी करावं लागलं होतं B ग्रेड सिनेमातं काम, मुलानं सांगितलं यामागचं सत्य नर आणि मादी अस्वलात झालेल्या तुंबळ हाणामारीत मादी अस्वल गंभीर जखमी होऊन मरण पावलं. याबाबत वनविभागाला माहिती मिळताच त्यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि मृत मादी अस्वलाला करहीभदरच्या डेपोत आणण्यात आलं. त्यानंतर पशुवैद्यकीय विभागाकडून शवविच्छेदन करून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.