मुंबई, 14 जून- प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येत असतात. अभिनेते मिथुन चक्रवती यांच्या आयुष्यात देखील 80 दशकात असचं काही घडलं होतं. एकवेळं अशी आली होती की, त्यांचे सिनेमा चालायचे नावचं घेत नव्हते. त्यानंतर दिग्दर्शक बब्बर सुभाष ‘डिस्को डान्सर’ हा चित्रपट मिथुन यांच्याकडे घेऊन आले. या चित्रपटानंतर मिथुन यांचे नशिब रात्रीत बदलले आणि ते स्टार झाले. पण या लोकप्रिय अभिनेत्याच्या आयुष्यात एक काळ असा ही आला होता, जेव्हा त्यांना बी ग्रेड चित्रपटांमध्येही काम करावं लागलं होतं. आता अनेक वर्षांनंतर त्यांचा मुलगा मिमोहनं वडिलांनी हा निर्णय का घेतला याचे कारण सांगितले आहे. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या कारकिर्दीतील कठीण काळात देखील हार मानली नाही. सिनेमात काम करणंही मिथुन यांच्यासाठी सोपं नव्हतं. कारकिर्दीच्या सुरुवातीलाही त्याच्या रंगामुळे त्यांना अनेक नकारांना सामोरे जावे लागले होते. तू हिरो झालास तर मी स्वत: तुझ्यासोबत चित्रपट बनवीन, असं आव्हानही अनेक दिग्दर्शकांनी त्यांना दिलं होतं. कोणत्या अभिनेत्याच्या आयुष्यात चढ-उतार येत नाहीतं, असंच काही मिथुन दादांच्या बाबतीत घडलं. एकेकाळी त्यांनी बी ग्रेड चित्रपटांमध्येही काम केले होते. त्यासाठी त्यांना अनेकदा टीकेला सामोरे जावे लागते. आता त्यांचा मुलगा मिमोहने वडिलांनी हा निर्णय घेण्यामागचं कारण सांगितलं आहे. वाचा- धक्कादायक! इंडस्ट्रीतील ज्युनिअर नाना पाटेकरचा आत्महत्येचा प्रयत्न मिमोहनं केला खुलासा मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती याने आपल्या मुलाखतीत सांगितले की, मी भाग्यवान आहे की त्याने आपल्या वडिलांचा वाईट काळ कधीच पाहिला नाही. वडील मिथुन चक्रवर्ती हे मोठे स्टार असूनही त्यांना बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम का करावे लागले, याचाही उल्लेख मिमोहनं केला. पण कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी त्यांनी हे सर्व केले. त्यांना घराचा सर्व खर्च भागवावा लागत होता. मिथुन चक्रवती दिवसातून चार शिफ्टमध्ये काम करायचे. अनेकवेळा ते आपल्या कामामुळे डिप्रेशनमध्ये जात असल्याचे देखील यावेळी त्याने सांगितलं.
चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे मिथुन व्हायचे निराश मिथुन यांचा मुलगा मिमोह याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, त्याची आई मिथुन यांच्या चांगल्या आणि वाईट काळाची साक्षीदार आहे. तो म्हणाला की, चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे त्यावेळी त्याचे वडील खूप निराश व्हायचे. आपलं काम चांगल्याप्रकारे पूर्ण करूनही अनेकदा सिनेमे फ्लॉप व्हायचे, त्यामुळे वडिलांना यांचं खूप वाईट वाटायचे. अनेकवेळा त्यांना चार शिफ्टमध्ये काम करावे लागत होते. मिथुन यांनी व्हॅनिटी व्हॅनची संकल्पना आणल्याचेही मिमोह यांनी बोलताना सांगितले. मिमोह ने कहा कि यह 2000 के आसपास हुआ था जब मिथुन का स्टारडम कमजोर हो रहा था। तोपर्यंत त्याने चित्रपटसृष्टीत आपले स्टारडम व्यतीत केले होते. त्यावेळी मिथुनला काही बी ग्रेड चित्रपटांमध्येही काम करावं लागलं होतं. जेव्हा त्यांना हे चित्रपट ऑफर झाले तेव्हा त्यांनी फक्त कुटुंबाचा विचार करून या चित्रपटांमध्ये काम केले. मिमोहने सांगितले की, 2000 सालाच्या आसपासची गोष्ट आहे, जेव्हा मिथुन यांचा स्टारडम काहीसा कमी होत होता. त्यावेळी त्यांना काही बी ग्रेड चित्रपटांमध्येही काम करावं लागलं होतं. जेव्हा त्यांना असे चित्रपट ऑफर झाले तेव्हा त्यांनी फक्त कुटुंबाचा विचार करून या चित्रपटांमध्ये काम केले.
मिथुन यांनी 1976 मध्ये मृग्या या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी शेकडो सिनेमे केले, पण एकेकाळी क्लासिक डान्स ऑफ लव्ह सारख्या बी ग्रेड चित्रपटांमध्येही त्यांना काम करावं लागलं.