मराठी बातम्या /बातम्या /Viral /झोपेसाठी कामाला सुट्टी, कंपनीकडून कर्मचाऱ्यांना अनोखं गिफ्ट, हे आहे खास कारण

झोपेसाठी कामाला सुट्टी, कंपनीकडून कर्मचाऱ्यांना अनोखं गिफ्ट, हे आहे खास कारण

व्हायरल

व्हायरल

कर्मचारी आपल्या कंपनीसाठी दिवसातील 9 ते 10 तास राबत असतात. कंपनीच्या वाढीसाठी कर्मचारी खूप मेहनतही घेतात. त्यामुळे बऱ्याचदा अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांना विविध गोष्टी गिफ्ट देतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 17 मार्च : कर्मचारी आपल्या कंपनीसाठी दिवसातील 9 ते 10 तास राबत असतात. कंपनीच्या वाढीसाठी कर्मचारी खूप मेहनतही घेतात. त्यामुळे बऱ्याचदा अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांना विविध गोष्टी गिफ्ट देतात. कर्मचाऱ्यांचा काम करण्याचा उत्साह वाढावा म्हणून कंपनीही त्यांना सरप्राईज देते. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आला असून एक कंपनीने चक्क आपल्या कर्मचाऱ्यांना अनोखी भेट दिली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.

बंगळुरुमधील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना अनोखी भेट दिली आहे. कंपनीने प्रत्येकाला इंटरनॅशनल स्लीप डेला ब्रेक दिला आहे जेणेकरून ते झोपू शकतील. ही घटना सध्या चांगलीच चर्चेत आली असून सोशल मीडियावर याचीच चर्चा रंगली आहे.

हेही वाचा -  Viral Video : पार्कमध्ये घसरगुंडी खेळणं महिलेच्या अंगलट, पुढे झाली अशी अवस्था

वेकफिट सोल्युशन्स या होम फर्निशिंग कंपनीने जागतिक झोपेदिनानिमित्त लिंक्डइनवर आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे, "झोपेच्या सुंदर भेटचा आस्वाद घ्या". सर्व वेकफिट कर्मचार्‍यांना 17 मार्च 2023 रोजी जागतिक झोप दिनानिमित्त विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना शनिवार रविवारची सुट्टीही मिळाली. म्हणजेच एक दिवसाची अतिरिक्त सुट्टीचा आस्वाद कर्मचाऱ्यांना मिळाला. आजचा दिवस त्यांच्यासाठी 3 दिवसांचा वीकेंड बनला आहे.

शुक्रवार, 17 मार्च रोजी आम्ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना ऐच्छिक सुट्टी देऊन आंतरराष्ट्रीय झोपेचा दिवस साजरा करत आहोत. हे जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. झोपेचे शौकीन म्हणून आपण स्लीप डे हा सण म्हणून साजरा करतो. विशेषतः जेव्हा तो शुक्रवारी येतो. इतर दिवसांप्रमाणे एचआर पोर्टलद्वारे रजा मिळू शकते. कंपनीने मेल करत कर्मचाऱ्यांसाठी लिहिलं, 'सरप्राईज हॉलिडे: अनाऊंसिंग द गिफ्ट ऑफ स्लीप'. आमच्या ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्डच्या सहाव्या सीझनमध्ये असे देखील नमूद करण्यात आले आहे की 2022 पासून, कामाच्या वेळेत झोपेची भावना असलेल्या लोकांमध्ये 21% वाढ झाली आहे आणि थकल्यासारखे जागे होणाऱ्या लोकांमध्ये 11% वाढ झाली आहे. झोपेची ही कमतरता पाहून यापेक्षा चांगला स्लीप डे साजरा करण्याचा दुसरा मार्ग असू शकत नाही, म्हणून त्यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना झोप दिनानिमित्त सुट्टी भेट दिली आहे. सोशल मीडियावर सध्या या कंपनीची वाहवा होताना दिसतेय.

First published:
top videos

    Tags: Sleep, Social media viral, Top trending, Videos viral, Viral