नवी दिल्ली, 16 मार्च : वाढत्या वयामुळे अनेकांना आपल्याला हव्या तशा गोष्टी करता येत नाही. अनेकजण त्यांच्या लहानपणीच्या आठवणीत हरवून जाताना दिसतात. जुन्या तरुणपणीच्या, लहानपणीच्या गोष्टी अनेकांना कराव्याशा वाटतात मात्र वयामुळे त्या शक्य होत नाहीत. मात्र असेही काही लोक आहेत जे वयाच्या बंधनाला बाजुला सारुन पुन्हा लहानपणीच्या गोष्टी करायचा प्रयत्न करतात. अनेकदा हे प्रयत्न यशस्वी होतात तर कधी कधी फसतात. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये महिलेने बालपणीच्या आठवणीला उजाळा देण्याचा प्रयत्न केला मात्र तिची भलतीच फजिती झालेली पहायला मिळाली. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडीओमध्ये एक महिला पार्कमध्ये दिसत आहे. पार्कमध्ये पोहोचताच तिच्यामधील लहान मुल जिवंत होतं आणि पुन्हा लहान मुलांसारखं बागडू लागतं. महिला पार्कमधील घसरगुंडीवर खेळताना दिसत आहे. महिला पार्कमधील घरगुंडी खेळताना दिसत आहे. मात्र घरगुंडीवरुन खाली येताना महिला जोरदाररित्या आपटते.
महिलेचा घसरगुंडीवरुन पडतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत असून त्याच्यावर भरपूर कमेंट आणि लाईक्सही येत आहेत. महिलेच्या चेहऱ्यावरील हसू मात्र तिचा आनंद दाखवून जात आहे. ती पुन्हा एकदा लहानपणात गेल्याची जाणीव होत आहे. नेटकरी या व्हिडीओ पसंती देत असून व्हिडीओला खूप सारं प्रेम देत आहेत.
दरम्यान, Kasthuri Gowda या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. याशिवाय महिलेचा पार्कमधील झुला खेळतानाचाही व्हिडीओ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला चार लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज आले आहेत.