नवी दिल्ली 22 जुलै : सध्या देशभरात सगळीकडेच टोमॅटो 100 रुपये किलोच्या आसपास मिळत आहेत. अनेक ठिकाणी तर टोमॅटोच्या किमती 200 ते 250 रुपये किलोपर्यंत पोहोचल्या आहेत. मात्र, आता सरकार नागरिकांना सवलतीच्या दरात टोमॅटो देण्याचा दावा करत आहे. मात्र यादरम्यान टोमॅटोबाबत घडलेल्या अनेक अजब घटना समोर येत आहेत. अशीच आणखी एक कहाणी समोर आली आहे. यात दुबईहून भारतात परतणाऱ्या एका महिलेला तिच्या आईने चक्क टोमॅटो आणायला सांगितले. यानंतर या महिलेनं असं काही केलं जे चांगलंच व्हायरल झालं. नुकतंच एका युजरने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, मुलांच्या शाळेला सुट्टी असल्याने माझी बहीण दुबईहून भारतात येत होती. येण्यापूर्वी तिने आईला विचारलं, की तुला दुबईहून काही आणायचं आहे का? त्यानंतर आईने क्षणाचाही विलंब न लावता 10 किलो टोमॅटो आणण्यास सांगितले. बहिणीनेही आईची आज्ञा मानली आणि तिथून टोमॅटोने भरलेली सुटकेस आणली. आता तिने सुटकेसमध्ये टोमॅटो कसे आणले असतील, या गोष्टीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
My sister is coming to India from Dubai for her children's summer holidays and she asked my mum if she wanted anything from Dubai and my mother said bring 10 kilos of tomatoes. 😑😑 And so now she has packed 10kg tomatoes in a suitcase and sent it.
— Revs :) (@Full_Meals) July 18, 2023
I mean.......
काही यूजर्स ही टोमॅटोबाबत घडलेल्या घटनांपैकी सर्वात वाईट घटना असल्याचं म्हणत आहेत. तर काही म्हणाले की, भारतात सुट्टीसाठी येणाऱ्या महिलेनं आईची इच्छा पूर्ण केली आहे. टोमॅटोच्या वाढत्या किमतींदरम्यान घडलेली अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. गेल्या महिनाभरात टोमॅटोच्या संदर्भात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्या यापूर्वी घडल्या नव्हत्या. अशाताच आता हे आणखी एक नवं प्रकरण दुबईतून समोर आलं आहे. Tomato price : बाजारात नेण्यासाठी रात्री 25 क्रेट गाडीत भरले; सकाळी गाडी पाहून हादरला शेतकरी टोमॅटोच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने सरकार टोमॅटोच्या किमतीवर बारीक लक्ष ठेवून आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी संसदेत सांगितलं की, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील नाशिक, नारायणगाव, औरंगाबाद पट्ट्यात नवीन मालाची आवक वाढल्याने टोमॅटोचे भाव कमी होण्याची अपेक्षा आहे. किमती वाढल्यापासून अनेक ठिकाणी टोमॅटो चोरीच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. नुकतंच पुण्यात एका शेतकऱ्याचे 400 किलो टोमॅटो चोरीला गेले होते. याबाबत पोलिसात तक्रार देताना शेतकऱ्याने आपलं मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं.