मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Interesting! महागड्या हॉटेलात फुकट डेझर्टसाठी नाटक, कपलनं केली Engagement

Interesting! महागड्या हॉटेलात फुकट डेझर्टसाठी नाटक, कपलनं केली Engagement

हॉटेलमधील एका ऑफरचं आकर्षण त्यांना काही केल्या आवरत नव्हतं. त्यासाठी त्यांनी एक कल्पना लढवली आणि तडीस नेली.

हॉटेलमधील एका ऑफरचं आकर्षण त्यांना काही केल्या आवरत नव्हतं. त्यासाठी त्यांनी एक कल्पना लढवली आणि तडीस नेली.

हॉटेलमधील एका ऑफरचं आकर्षण त्यांना काही केल्या आवरत नव्हतं. त्यासाठी त्यांनी एक कल्पना लढवली आणि तडीस नेली.

  • Published by:  desk news

ब्रिटन, 9 डिसेंबर: महागड्या हॉटेलमधील ऑफरनुसार (Hotel Offer) फुकटात डेझर्ट (Free desert) मिळवण्यासाठी एका कपलनं खोटा साखरपुडा (Fake engagement) केल्याचं जाहीर केलं आहे. भारतात खरं तर लग्न आणि साखरपुडा या प्रकाराकडे गांभिर्यानं पाहिलं जातं. अनेक भारतीयांच्या दृष्टीनं लग्न हा त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्ताचा टप्पा असतो. लग्न जास्तीत जास्त टिकावं आणि संसारात कुठलेही अडथळे येऊ नयेत, यासाठी प्रत्येकजण काळजी घेत असतो. लग्नाला गांभिर्यानं घेतलं जातं आणि विवाहसंस्थेचं एक वेगळं महत्त्व आणि आदर राखला जातो. मात्र पाश्चिमात्य देशांत लग्नाबाबत तितकंसं गांभिर्य पाळलं जात नाही. अनेकदा लग्न हा थट्टा आणि मस्करीचा विषय म्हणूनदेखील पाहिला जातो. ब्रिटनमध्ये नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून याची प्रचिती आली आहे.

कपलनं केलं साखरपुडा

लंडनमध्ये राहणाऱ्या हॅरी कॉलिन्स आणि रियान स्मिथ या दोघांचं एक कॉमन स्वप्न होतं. लंडनमधील सर्वात महागडं हॉटेल असणाऱ्या हॉटेल शार्डमध्ये जाण्याचं आणि तिथं खास ऑफरमधून मिळणारं डेझर्ट खाण्याचं. या हॉटेलनं त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर दिली होती. या ऑफरनुसार हॉटेलमध्ये राहत असताना जर एखाद्या जोडप्याचं लग्न किंवा साखरपुडा झाला, तर त्यांची रुम अपग्रेड केली जाईल आणि त्यांना खास शुभेच्छासंदेश लिहिलेलं डेझर्ट दिलं जाईल. आपल्याला ही ऑफर मिळावी यासाठी दोघांनी मिळून प्लॅन केला आणि त्याची सराईतपणे अंमलबजावणी केली.

केली खोटी एंगेजमेंट

लंडनमधील हॉटेल शार्डमध्ये अगदी 8000 रुपयांपासून 1 लाख रुपये भाडं असणाऱ्या खोल्या आहेत. यातील स्वस्तातील खोली त्यांनी भाड्यानं घेतली आणि त्त्यात राहायला सुरुवात केली. तिथल्या मुक्कामात त्यांनी लग्नाचा बेत आखला आणि एकमेकांसोबत साखरपुडा केला. हॉटेलच्या प्रशासनाला याची कल्पना दिल्यानंतर त्यांची रुम अपग्रेड करण्यात आली आणि त्यांना हवं असलेलं शुभेच्छासंदेश लिहिलेलं डेझर्टही मिळालं.

हे वाचा- Mega Job Alert: महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात तब्बल 1013 पदांसाठी मोठी भरती

इंटरनेटवर संमिश्र प्रतिक्रिया

आपला हा अनोखा उपक्रम दोघांनी सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यावर नेटिझन्सनी प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पाडला. काहीजणांना ही कल्पना फारच आवडली, तर काहीजणांनी लग्नसंस्थेचा अपमान केल्याबद्दल दोघांवर टीकाही केली.

First published:

Tags: Britain, Couple, Engagement