Home /News /viral /

Oh No! सर्कशीत स्टंट करताना भयानक अपघात, Video पाहून येईल अंगावर काटा

Oh No! सर्कशीत स्टंट करताना भयानक अपघात, Video पाहून येईल अंगावर काटा

नेहमीप्रमाणेच तो सर्कशीत एकामागून एक स्टंट करत होता. मात्र एका स्टंटवेळी त्याचा अंदाज चुकला आणि तो तब्बल 20 फुटांवरून खाली कोसळला.

    बर्लिन, 25 जानेवारी: सर्कस (Circus) सुरू असताना एक स्टंट (Stunt) चुकल्यामुळे कलाकाराचा (Artist and stuntman) भीषण अपघात (Accident) झाला आणि तो तब्बल 20 फूट (20 feet) उंचावरून खाली कोसळला. जर्मनीतील डिसबर्ग शहरात सर्कशीचा प्रयोग सुरू असताना झालेल्या या भयानक अपघातामुळे एकच सन्नाटा पसरला होता. एका दोरीला लोंबकळत त्याने झोका घेऊन हात सोडला आणि हवेत तरंगत तो दुसऱ्या टोकावर चालला होता. तिथं तो पोहोचलादेखील. मात्र त्याच्या हातांची घट्ट पकड न बसल्यामुळे त्याचा तोल गेला आणि काही समजायच्या आतच हा कलाकार 20 फूट खाली कोसळला. या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला असून सोशल मीडियावर तो जोरदार व्हायरल होत आहे.  असा झाला अपघात जर्मनीतील सर्कशीदरम्यान लुकाझ मलेस्की नावाचा स्टंट्समन रोलरब्लेडवर स्टंट करत होता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हवेत उडल्याप्रमाणे उडी मारून पोहोचायचं, मग तिथून आणखी वेगळ्या ठिकाणी उड्डाण करायचं, असा हा स्टंट असतो. लुकाझ वर्षानुवर्षं हा स्टंट लिलया करत होता आणि प्रत्येकवेळी प्रेक्षक टाळ्यांच्या गजरात त्याच्या या प्रयोगाला दाद देत असत. मात्र मंगळवारच्या प्रयोगात काही भलतंच घडलं. झाला मोठा अपघात व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे लुकाझ एका ठिकाणाहून झेपावत दुसऱ्या ठिकाणी पोहोचला, मात्र तिथं त्याला हात पकडता आले नाहीत. त्याच्या हातांची पकड सुटल्यामुळे दुसऱ्याच क्षणी तो खाली कोसळला. तिथं उभ्या असणाऱ्या कलाकाराने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याआधीच लुकासचा तोल गेला होता. लुकास जमिनीवर कोसळल्यानंतर आजूबाजूच्या कलाकारांनी त्याच्याकडे धाव घेत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.  थोडक्यात निभावलं लुकासच्या मनगटाचं हाड मोडलं असून इतरत्र मुका मार लागला आहे. मात्र जीवावर आलेलं हे संकट केवळ मनगटाच्या हाडावर निभावल्यामुळे आपण सुदैवी असल्याची प्रतिक्रिया लुकासने दिली आहे. काहीही झालं तरी आपण जिवंत आहोत, हीच आपल्यासाठी सर्वात मोठी गोष्ट असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Accident, Germany

    पुढील बातम्या