झाबुआ(विरेंद्र सिंग),01 एप्रिल : मध्यप्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. झाबुआ या शहरात 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. दरम्यान याबाबत पोलीस अधिक तपास करत होते. या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मुलीवर बलात्कार करून हत्या करणारा तिचा मामाच असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या घटनेत आरोपी स्वतः अल्पवयीन आहे. झाबुआचे एसपी आगम जैन यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
झाबुआचे एसपी आगम जैन म्हणाले की, मृत तरुणी अलीराजपूर जिल्ह्यातील जोबटजवळील गावातील रहिवासी होती. ती तिच्या मावशीच्या घरी तिच्या कुटुंबीयांसह लग्नासाठी आली होती. यावेळी ती अचानक मध्यरात्री बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी रात्रभर तीचा शोध घेतला, ती कुठेच मिळाली नाही.
गोऱ्या, निरागस चेहऱ्यामागचं काळं सत्य; या महिलेनं घेतले 29 जणांचे जीव, कोण आहे ‘व्हाइट विडो’ समंथा?दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी तीचा मृतदेह गावातील नाल्याजवळ आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरण पोलिसांनी कसून तपास केला. यामध्ये मुलीच्या 17 वर्षीय अल्पवयीन मामाने बलात्कार करून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे.
रात्री मुलगी बाथरूमला जाण्यासाठी उठली तेव्हा तिच्या मामाने तिला शौचालयात जाण्यासाठी नेले. यानंतर त्या मामाचे मन परिवर्तन झाले अन् त्याने तिच्यावर थेट अत्याचार केला. यावेळी त्या मुलीला हे सहन झाले नाही यामध्ये ती बेशुद्ध झाली. यावेळी घाबरलेल्या मामाने तिचा गळा आवळून खून करून मृतदेह नदीजवळील झुडपात फेकून दिल्याची कबुली मामाने दिली.
मृत मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, रात्री दीड वाजेपर्यंत मुलगी आमच्याजवळ झोपलेली होती. त्यानंतर ती दिसली नाही, मग तिचा शोध सुरू केला. रात्रभर शोध घेऊनही सापडली नाही. यावेळी सकाळी गावातील नाल्याजवळ मुलीचा मृतदेह आढळून आला. तिचा चेहरा छिन्नविछीन्न अवस्थेत होता तर तिच्या नाकातून रक्त येत होते तर गळ्यावरही जखमेच्या खुणा होत्या. यावेळी पोलिसांनी तात्काळ त्या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.
पीएम रिपोर्टमध्ये मुलीवर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. संशयाच्या आधारे पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. मुलीच्या मामाचे नाव समोर आले. सुरुवातीला मामाने या घटनेस नकार दिला यानंतर पोलिसांनी कसून चौकशी करताच हे कृत्य केल्याची कबुली दिली.