मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /दारुड्या बापाने शिवीगाळ केली, 22 वर्षीय तरुणीला राग झाला अनावर, घेतला भयानक निर्णय

दारुड्या बापाने शिवीगाळ केली, 22 वर्षीय तरुणीला राग झाला अनावर, घेतला भयानक निर्णय

सिद्धीका संदीप चव्हाण

सिद्धीका संदीप चव्हाण

रायगडमधील एका 22 वर्षीय तरुणीने भयानक निर्णय घेतला.

  • Local18
  • Last Updated :
  • Raigad, India

मोहन जाधव, प्रतिनिधी

रायगड, 31 मार्च : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आत्महत्येच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे दिसत आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तरुणाईचाही समावेश मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यातच आता रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

दारुड्या बापाने शिवीगाळ केल्यामुळे एका 22 वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या केली. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील भावे- चौधरी वाडी येथे ही धक्कादायक घटना घडली. वडील दारू पिऊन सतत शिवीगाळ करीत असल्याने त्यांच्या जाचाला कंटाळून या तरुणीने विषारी औषध पिऊन जीवन संपवले. सिद्धीका संदीप चव्हाण असे या मृत तरुणीचे नाव आहे.

मृत्यूपूर्वी सिद्धीका काय म्हणाली -

मी उंदराचे (रेक्टोल) औषध प्यायली आहे, असे सिद्धीका हिने मृत्यूपूर्वी जबाब दिला. सिद्धीका हिला उलट्याचा त्रास होऊ लागल्याने तिला प्राथमिक उपचाराकरिता महाड ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले. परंतु सिद्धीका हिची प्रकृती अधिक बिघडल्यामुळे तिला अधिक उपचाराकरिता मुंबई येथील जे जे रुग्णालय येथे पाठविण्यात आले. दरम्यान, प्रकृती अधिक खालावल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पुणेकर व्यापाऱ्यासोबत घडलं भयंकर - 

पुणे व्यावसायिक असलेल्या मगरपट्टा परिसरात राहणाऱ्या व्यक्तींशी ओळख वाढवून त्याच्याशी लगेच करून त्याला फ्लॅटवर बोलवून निधी दीक्षीत या महिलेने काही फोटो काढले. तसेच यानंतर विक्रम भट या वकिलाच्या मदतीने लोणीकीळभोर पोलिसांकडे बलात्काराची तक्रार दिली. इतकेच नव्हे तर ती मागे घेण्यासाठी वेळोवेळी लाखो रूपये घेऊन तब्बल 18 लाख रूपये उकळले. या संदर्भात फिर्यादीने शेवटी पैशांच्या मागणीला वैतागून हडपसर पोलिसांकडे तक्रार दिली आणि चौकशीनंतर या जोडीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Death, Local18, Raigad