रांची, 04 नोव्हेंबर : काही अल्पवयीन मुली प्रेग्नंट झाल्याची प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण सध्या असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. चक्क एक नवजात बाळ प्रेग्नंट झालं आहे. अवघ्या 23 दिवसांच्या चिमुकल्याच्या पोटात भ्रूण सापडले आहेत. एक-दोन नव्हे तर तब्बल 8 भ्रूण या एवढ्याच्या जीवाच्या पोटात होते. हे पाहून डॉक्टरही शॉक झाले आहेत. झारखंडच्या रांचीमधील हे धक्कादायक प्रकरण आहे.
झारखंडच्या रामगढमध्ये राहणाऱ्या एका महिलेने 10 ऑक्टोबरला एका मुलीला जन्म दिला. पण जन्मानंतर तिच्या पोटात दुखू लागलं. रामगढ रुग्णालयात तिचं सीटी स्कॅन केलं तेव्हा तिच्या पोटात ट्युमर असल्याचं डॉक्टरांना वाटलं. त्यानंतर तिला तात्काळ रांचीतल्या राणी चिल्ड्रन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं डॉक्टरांना धक्काच बसला.
हे वाचा - आश्चर्य! श्वानाच्या पोटी जन्माला आली 'बकरी'; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO
डॉक्टरांनी तिच्या तपासण्या केल्या तेव्हा तिच्या पोटात ट्युमर नव्हे तर भ्रूण असल्याचं दिसलं. तब्बल 8 भ्रूण तिच्या पोटात होते. डॉक्टरांनी ऑपरेशन करून मुलीच्या पोटातील अविकसित भ्रूण काढले आहेत.
एशियानेट न्यूज हिंदीच्या वृत्तानुसार या मुलीचं ऑपरेशन करणारे डॉ. इम्रान यांनी सांहितलं की, जगातील 5-10 लाख मुलांमध्ये एक असं प्रकरण होतं. आतापर्यंत जगात 200 अशी प्रकरणं आहेत. भारतातील हे पहिलं प्रकरण आहे. कारण याआधी लहान मुलांच्या पोटातून एक किंवा दोन भ्रूण काढण्यात आले आहेत. पण 8 भ्रूण हे धक्कादायक आहे. या स्थितीला फिटस इन फिटू म्हणतात.
नवजात बाळांच्या पोटात भ्रूण असण्याच्या घटना दुर्मिळ आहेत. पण एकाच बाळाच्या पोटातून इतक्या प्रमाणत भ्रूण निघणं हे देशातीलच नव्हे तर जगातील असं पहिलंच प्रकरण असल्याचं सांगितलं जातं आहे.
फोटस इन फेटू म्हणजे नेमकं काय?
'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार खारघरमधल्या मदरहूड हॉस्पिटलमधल्या मॅटर्नल फीटल मेडिसिन या विभागातल्या सल्लागार डॉ. प्रिया देशपांडे यांनी या विकृतीबद्दल अधिक माहिती दिली. "ही जन्मजात विकृती अत्यंत दुर्मीळ असून, 5 लाख नवजात बाळांपैकी एखाद्या बाळामध्ये ती दिसू शकते, असं डॉ. देशपांडे म्हणाल्या. खरं तर ही दोन बाळं म्हणजे एकाच बीजांडापासून जन्मणार असलेली जुळी बाळं असतात. त्यांना Monozygotic Twins असं म्हणतात. काही कारणामुळे ही दोन बाळं आईच्या गर्भात स्वतंत्रपणे न वाढता एका बाळाच्या (Host Twin) शरीरात दुसरा गर्भ (Parasitic Twin) वाढू लागतो. ही विकृती प्रामुख्याने बाळ अगदी लहान असतानाच उघड होते. साधारणतः बाळाच्या जन्मानंतर उशिरात उशिरा 18व्या महिन्यापर्यंत ही विकृती लक्षात येते."
हे वाचा - VIDEO - खेळता खेळता लिफ्टमध्ये गेलेला 11 वर्षांचा मुलगा तिथंच अडकला; तासाभराने लिफ्ट उघडली तेव्हा...
"यापैकी बहुतांश केसेसमध्ये एका बाळाच्या पोटात एकच गर्भ आढळतो; मात्र एका बाळाच्या पोटात अनेक गर्भ असल्याच्या काही दुर्मिळ नोंदीही असल्याची माहिती डॉ. देशपांडे यांनी दिली. सर्वसाधारणपणे बाळाच्या शरीराच्या (Abdomen) मधल्या भागातल्या Retroperitoneum या टिश्यूजमध्ये गर्भ आढळू शकतो; मात्र मेंदू किंवा कमरेचं हाड अशा ठिकाणीही गर्भ आढळल्याच्या नोंदी वैद्यकीय शास्त्रात केलेल्या आहेत", असंही डॉ. देशपांडे यांनी स्पष्ट केलं.
अल्ट्रासोनोग्राफी, प्लेन रेडिओग्राफी, कम्प्युटेड सोनोग्राफी (CT), मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (MRI) आदींच्या साह्याने या विकृतीचं निदान करता येतं. ही विकृती आहे, याचं नेमकं निदान झाल्यानंतर शस्त्रक्रिया अर्थात Operation हा त्याच्यावरचा ठोस उपाय आहे. ही धोकादायक विकृती मानली जात नाही. शस्त्रक्रिया करून आतला गर्भ काढून टाकल्यावर संबंधित बाळ सर्वसामान्य आयुष्य जगू शकतं, असा अनुभव आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Jharkhand, Small baby, Viral