लंडन, 06 जुलै : लॉकडाऊनमुळे सध्या घरांत विविध पदार्थ तयार केले जात आहेत. मात्र या सगळ्यात एका चुकीमुळे महिलेला आपला जीव गमवावा लागला. ब्रिटनमधील डर्बीशायर येथील एक महिला स्वयंपाकघरात चिप्स तळत होती. पण ज्या तेलात ती चिप्स तळत होती ते खाण्याचे तेल नसून लूब्रिकेटिंग तेल (मशीनमध्ये वापरायचे तेल) होते. त्यामुळं तेल गरम झाल्यानंतर संपूर्ण घरात विषारी धूर पसरला. या धूरामुळं या महिलेचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्टनुसार, 74 वर्षीय कॅरोल ओल्डफिल्ड डर्बीशायरमध्ये आपल्या घरात तेल तळत होत्या. त्यावेळी चुकून त्यांनी मशीनमध्ये ऑयलिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या तेलाचा वापर केला. मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, तपासात असे दिसून आले की, या महिलेनं चिप्स तळल्यानंतर ती झोपून गेली. वाचा- VIDEO : मोठमोठ्या बॉ़डी बिल्डरना टक्कर देतेय ही 24 वर्षांची तरुणी मात्र तिला जाग आली तेव्हा संपूर्ण घरात विषारी धूर पसरला होता. त्यामुळं या महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. हा धूर पाहून त्यांच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला फोन केला, त्यानंतर या महिलेला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवस व्हेंटिलेटवर ठेवण्यात आल्यानंतरही त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही. वाचा- मायकल जॅक्सनचा पुनर्जन्म? मजुराचा हा डान्स VIDEO पाहून तुम्हीही व्हाल शॉक काय आहे हे विषारी तेल या महिलेच्या मेंदूची तपासणी केल्यानंतर असे दिसून आले की त्यांच्यात डिमेनिशायची लक्षणं दिसून आली. दरम्यान, ज्या तेलाचा वापर या महिलेनं चिप्स तळण्यासाठी केला, ते तेल गंज चढलेल्या मशीनसाठी वापरले जाते. या तेलामध्ये केमिकलचा समावेश असतो, त्यामुळं लहान मुलांपासून हे तेल दूर ठेवण्याचे सांगितले जाते. मात्र या महिलेने हे तेल गरम केल्यामुळं त्यातून विषारी वायू बाहेर पडला. वाचा- एक नंबर! फक्त 60 सेकंदात ‘या’ भारतीयानं साऱ्या जगाला शिकवलं फिजिक्स संपादन-प्रियांका गावडे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)








