मराठी बातम्या /बातम्या /Viral /

71 वर्षांच्या आजीचं 17 वर्षीय कोवळ्या मुलावर जडलं प्रेम; लेकाच्या मृत्यूनंतर लगेच केलं लग्न

71 वर्षांच्या आजीचं 17 वर्षीय कोवळ्या मुलावर जडलं प्रेम; लेकाच्या मृत्यूनंतर लगेच केलं लग्न

फोटो सौजन्य - instagram.com/garyandalmeda

फोटो सौजन्य - instagram.com/garyandalmeda

तब्बल 53 वर्षांच्या वयाचं अंतर असलेलं हे कपल कायम ट्रोल होतं.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 04 मार्च : प्रेम कधी, कुठे आणि कुणावर होईल हे सांगू शकत नाही. प्रेमाला आता वयाचीही मर्यादा राहिली नाही. सामान्यपणे लग्न करताना पुरुषांचं वय महिलांपेक्षा जास्त किंवा समान असतं. पण बरेच कपल असे आहेत, ज्यांच्यामध्ये महिलांचं वय पुरुषांपेक्षा जास्त आहे. पण वयातील हे अंतर फारफर तर किती असावं. एक वर्षे, दोन वर्षे, पाच वर्षे, दहा वर्षे... बस्सं कपलमधील वयाच्या अंतराचा हा आकडा ऐकूनच तुम्हाला धक्का बसला. पण आम्ही तुम्हा अशा कपलबाबत सांगणार आहोत ज्यांच्या वयात तब्बल 53 वर्षांचं अंतर आहे. त्यातही शॉकिंग म्हणजे एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या कपलपैकी मुलगा अवघ्या 17 वर्षांचा तर महिला तब्बल 71 वर्षांची (Couple 53 age gap).

अमेरिकेतील गॅरी  (Gary)आणि अल्मेडा (Almeda) हे विवाहित दाम्पत्य त्यांच्यातील वयाच्या अंतरामुळे चर्चेत आहे. त्यांच्यामध्ये इतक्या वर्षांचं अंतर आहे की लोक त्यांना ट्रोल करतात.

मिररच्या रिपोर्टनुसार या दोघांचीही पहिली भेट 2015 साली झाली. अल्मेडाचा मुलगा रॉबर्ट याचा मृत्यू झाला. त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी ती गॅरीला भेटली. तेव्हा गॅरी 17 वर्षांचा तर अल्मेडा 71 वर्षांची होती. या पहिल्या भेटीनंतर दोघांमध्ये बोलणं होऊ लागलं, हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडलं. इतकंच नव्हे तर त्यांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला. अवघ्या 15 दिवसांतच त्यांनी लग्न केलं.

हे वाचा - चक्क तरुणी या मॉडेलवर उधळतात लाखो रुपये; आपल्या BF सोबत करायला लावतात 'हे' काम

2015 साली त्यांचं लग्न केलं. गॅरी आता 24 वर्षांचा आहे. तर अल्मेडा 77 वर्षांची आहे.  हे लग्न यांच्यासाठी सोपं नाही, असं बऱ्याच लोकांनी सांगितलं. जे त्यांच्या नात्याला पाठिंबा देत नाही, त्यांना त्यांनी सोडून दिलं. गॅरी आणि अल्मेडाने आपलं वैवाहिक आयुष्य खूप चांगलं आहे, त्यामुळे आपल्याला रिलेशनशिपबाबत काहीच पश्चाताप होत नाही असं सांगितलं आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी आपल्या लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा केला.

First published:

Tags: Couple, Relationship, Viral