केपटाऊन, 04 मार्च : गर्लफ्रेंड असो वा पत्नी कोणत्याही महिलेला आपला बॉयफ्रेंड (Girlfriend Boyfriend) किंवा नवरा (Husband wife) दुसऱ्या कुणा महिलेसोबत असलेला बिलकुल आवडत नाही. असं असताना स्वतः महिलाच या मॉडेलला आपल्या बॉयफ्रेंडसोबत असं काही काम करायला भाग पाडतात की त्यासाठी ते लाखो रुपयेही या मॉडेलला देतात. तरुण नव्हे तर चक्क तरुणीच या मॉडेलवर लाखो रुपये उधळतात. प्लेबॉय आफ्रिकेच्या कव्हरवर दिसणारी ही मॉडेल कॅरोलिना लेकर. दुसऱ्या महिलांच्या बॉयफ्रेंडसोबत गोड गोड गप्पा मारते, चॅट करते आणि त्यांना भेटते. खरंतर हे सर्व करायला संबंधित तरुणांच्या गर्लफ्रेंडच तिला भाग पाडतात. त्यांच्याच सांगण्यावरून ती त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत हे सर्व करते. यासाठी तिला पैसैही मिळतात. आता तुम्ही म्हणाल की कोणतीही महिला दुसऱ्या महिलेला आपल्या पार्टनरसोबत असं का बरं करायला सांगेल आणि त्यासाठी पैसे का देईल. हे वाचा - हेच बाकी होतं! परफेक्ट मॅच मिळवून देण्यासाठी डेटिंग साइटची देवासोबत पार्टनरशिप तर ही मॉडेल इतर महिलांच्या बॉयफ्रेंडची लॉयल्टी टेस्ट करते. म्हणजे तो आपल्या गर्लफ्रेंडसोबत किती एकनिष्ठ, प्रामाणिक आहे ते तपासते. म्हणजे गर्लफ्रेंडसमोर आपण किती प्रामाणिक आहोत हे दाखवणारे बॉयफ्रेंड इतर महिलांसोबत कसं बोलतात, काय करतात हे ती जाणून घेते. डेली स्टार च्या रिपोर्टनुसार ही मॉडेल चीटर बॉयफ्रेंड पकडण्याच्या मोहिमेवर आहे. नात्यातील विश्वासघात तिला संपवायचा आहे. त्यामुळे बॉयफ्रेंडची लॉयल्टी टेस्ट करण्यासाठी ती महिलांकडून दीड लाख रुपये घेते. जर कुणाचा बॉयफ्रेंड चीट करत नसेल तर ती पैसे परत करते. हे वाचा - Shocking! डोळ्याच्या सर्जरीचा भयंकर परिणाम; महिलेच्या डोक्यावर उगवली शिंगं महिला तिला आपल्या बॉयफ्रेंडचा नंबर आणि इन्स्टाग्राम अकाऊंट देतात. ज्यावर ती संपर्क करते. जर त्यांच्या बॉयफ्रेंडने तिच्याशी चॅट केलं नाही तर ती त्यांचे पैसे त्यांना परत करते, असं तिनं सांगितलं. माझ्याशी खूप कालावधी बोलल्यानंतर जर त्यांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली तर मला पैसे मिळतात आणि ते प्रामाणिकपणाची परीक्षा फेल होतात, असं ती म्हणाली. या कामामुळे आतापर्यंत साडेसात लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे कमावल्याचा दावा तिने केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







