जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 7 वर्षाच्या मुलाला अचानक होऊ लागला श्वास घेण्यास त्रास; X-ray रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

7 वर्षाच्या मुलाला अचानक होऊ लागला श्वास घेण्यास त्रास; X-ray रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

7 वर्षाच्या मुलाला अचानक होऊ लागला श्वास घेण्यास त्रास; X-ray रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

ट्विटरवर डॉ. मोहम्मद शैफुल यांनी त्यांच्या सात वर्षांच्या रुग्णाचा एक्स-रे रिपोर्ट शेअर केला आहे. वेळीच योग्य उपचार झाले नसते तर मुलाचा मृत्यू झाला असता

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 30 मार्च : लहान मुलं निरागस असतात. त्यांना समोर दिसणारी प्रत्येक गोष्ट खेळण्यासाठीच असते, असं वाटतं. अशा परिस्थितीत पालकांना खूप जबाबदारीने वागावं लागतं. त्यांना यावरही विशेष लक्ष ठेवावं लागतं, की त्यांच्या मुलांच्या आजूबाजूला अशी कोणतीही धोकादायक गोष्ट नाही ज्यातून त्यांना काही नुकसान पोहोचेल. अलीकडेच सोशल मीडियावर (Social Media) एका डॉक्टरने त्यांच्याकडे आलेली एक केस ट्विटरवर शेअर केली. यामागचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं. याबद्दल माहिती देऊन त्यांना इतर पालकांनाही सावध करायचं आहे. प्रेयसीचं लोकेशन ट्रॅक करण्यासाठी केली हद्द पार; अशा ठिकाणी बसवलं Apple Watch की पोलसही हैराण ट्विटरवर डॉ. मोहम्मद शैफुल यांनी त्यांच्या सात वर्षांच्या रुग्णाचा एक्स-रे रिपोर्ट शेअर केला आहे. वेळीच योग्य उपचार झाले नसते तर मुलाचा मृत्यू झाला असता. या मुलाने पन्नास पैशाचं एक नाण गिळलं होतं (Boy Swallowed Coin), जे थेट त्याच्या अन्ननलिकेत अडकलं होतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ते दुसऱ्या वाहिनीत अडकलं असतं तर मुलांचे प्राण वाचले नसते.

जाहिरात

या प्रकरणाची संपूर्ण माहिती देताना डॉ. शैफुल म्हणाले की, त्यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांना सांगितलं होतं की, एका मुलाला आपत्कालीन स्थितीत दाखल करण्यात आलं आहे. मुलाने नाणं गिळलं होतं आणि त्याची प्रकृती चिंताजनक होती. हे समजताच डॉक्टरांनी प्रथम त्याच्या श्वासोच्छवासाच्या पद्धतीची माहिती विचारली. त्यानंतर त्याचा एक्स-रे रिपोर्ट मागवला. अहवाल पाहिल्यानंतर त्यांना संपूर्ण प्रकरण समजलं. काळजाचा ठोका चुकवेल हे दृश्य; कधीच पाहिला नसेल इतका खतरनाक Bike Stunt Video वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मुलाची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या अन्ननलिकेत काहीतरी अडकलं होतं. डॉ.शैफुल यांनी अहवाल पाहिल्यावर त्यांना समजलं की, ही अडकलेली वस्तू प्रत्यक्षात एक नाणं आहे. सुदैवाने नाणं श्वासनलिकेत न अडकता अन्ननलिकेत अडकलं होतं. नाणं श्वासनलिकेत अडकलं असतं तर या मुलाला श्वास घेता आला नसता. अडकल्यास. यामुळे त्याचा मृत्यूही होऊ शकत होता. डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करून नाणं बाहेर काढलं. मुलाची प्रकृती आता स्थिर असून तो बरा होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात