मराठी बातम्या /बातम्या /Viral /

सोफ्यावर बसल्यानंतर जाणवली हालचाल; उशी उचलताच बाहेर आला 7 फूट लांब विषारी साप, Shocking Video

सोफ्यावर बसल्यानंतर जाणवली हालचाल; उशी उचलताच बाहेर आला 7 फूट लांब विषारी साप, Shocking Video

तुम्ही ऑफिसमधून थकून घरी परतल्यावर आणि सोफ्यावर बसल्यावर तुम्हाला काहीतरी हालचाल जाणवली आणि तपासणी केल्यावर इथे ७ फूट लांब विषारी साप दिसला तर?

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 07 एप्रिल : आजकाल सोशल मीडियावर (Social Media) अनेक भितीदायक आणि थरकाप उडवणाऱ्या काही घटना मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. असे व्हिडिओ नेटकऱ्यांच्या भरपूर पसंतीसही उतरतात. अशात या व्हिडिओंला भरपूर व्ह्यूजही मिळतात. आता साप म्हटलं तर विषारी सापापासून दूर राहाण्यातच जवळपास सगळेच आपलं भलं समजतात. मात्र, अनेकदा सापच मानवी वस्तीमध्ये शिरतात. याच कारणामुळे लोकांच्या मनात सापाबद्दल भीती निर्माण झाली आहे.

हातपाय बिलकुल हलवू शकत नव्हता; पण नर्सने असं काही केलं की अंथरूणातच नाचू लागला तरुण रुग्ण

तुम्ही ऑफिसमधून थकून घरी परतल्यावर आणि सोफ्यावर बसल्यावर तुम्हाला काहीतरी हालचाल जाणवली आणि तपासणी केल्यावर इथे ७ फूट लांब विषारी साप दिसला तर? सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. यात कॅलिफोर्नियातील एका व्यक्तीने त्याच्या घरी असलेल्या सोफ्यावर एक साप एक उशीच्या मागे आराम करत असल्याचं पाहिलं. घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Snake Shocking Video) झाला असून हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.

व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये साप सोफ्याच्या उशीखाली लपून बसलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये, सर्प तज्ज्ञ आणि सो-कॅल रॅटलस्नेक रिमूव्हलचे मालक अॅलेक्स तेजो सापाला नियंत्रित करताना आणि हातात धरताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ते म्हणत आहेत की, 'ठीक आहे, मला आता काय करावं हेदेखील माहिती नाही. मला कोणीतरी साप पकडायला बोलावलं.

होणाऱ्या नवऱ्याचा कॉम्प्युटर उघडताच सरकली पायाखालची जमीन; तरुणीने ताबडतोब रद्द केलं लग्न

दरम्यान, साप अॅलेक्सवर हल्ला करण्यासाठी पुढे येताना दिसतो, मात्र अॅलेक्स तितक्याच वेगाने मागे सरकत आपला बचाव करतात. सध्या सोशल मीडियावर एका युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना अॅलेक्स म्हणाले की, साप सोफ्यापर्यंत कसा पोहोचला हे अजूनही एक रहस्य आहे. बातमी देईपर्यंत या व्हिडिओ लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी हा थरकाप उडवणारा व्हिडिओ लाईकही केला आहे.

First published:

Tags: Shocking video viral, Snake video