मराठी बातम्या /बातम्या /Viral /

66 वर्षांच्या आजीबाईंनी केला नको तो प्रताप; पाहून डॉक्टरांनाही फुटला घाम

66 वर्षांच्या आजीबाईंनी केला नको तो प्रताप; पाहून डॉक्टरांनाही फुटला घाम

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

पोटदुखीची तक्रार घेऊन आलेल्या 66 वर्षांच्या महिलेचा रिपोर्ट पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.

  • Published by:  Priya Lad
डबलिन, 20 सप्टेंबर : वय वर्षे 66... या वयापर्यंत बरंच काही पाहिलेलं असतं. वयानुसार बराच अनुभव आलेला असतो. आम्ही खूप पावसाळे पाहिले असं म्हणत या वयातील व्यक्ती आपली मुलं, नातवंडांना उपदेश, सल्ले देत असतात. पण याच वयात एका आजीबाईंनी जो प्रताप केला तो पाहून डॉक्टरही शॉक झाले. 66 वर्षांच्या महिलेचा मेडिकल रिपोर्ट पाहून आणि त्यानंतर जे करावं लागलं, त्यामुळे डॉक्टरांनाही घाम फुटला. आयर्लंडच्या डबलिनमधील हे धक्कादायक प्रकरण. 66 वर्षांच्या महिलेच्या पोटात दुखू लागलं म्हणून ती सेंट विनसेंट हॉस्पिटलमध्ये गेली. डॉक्टरांनी तिचा एक्स-रे केला. तेव्हा रिपोर्टमध्ये जे दिसलं ते पाहून डॉक्टरांना धक्काच बसला. तिच्या पोटात चक्क घड्याळ, टीव्हीच्या रिमोटमध्ये वापरल्या बॅटरी होत्या. हे वाचा - Shocking! घाईघाईत नवऱ्यानेच केली डिलीव्हरी; बाळ जन्मताच मोबाईल चार्जरने...; बायकोही हादरली लहान मुलांनी बॅटरी गिळल्याची प्रकरणं तुम्हाला माहिती असतील पण प्रौढ, वयस्कर व्यक्तीही असं काही करू शकतात, याचंच आश्चर्य वाटेल. त्यातही धक्कादायक म्हणजे तिच्या पोटात फक्त एक बॅटरी नव्हे तर बॅटरींचा ढिगच होता. डॉक्टरांनी पोटाची तपासणी केली असता सुदैवाने या बॅटरीमुळे तिच्या आतड्यांचा मार्ग ब्लॉक झाला नव्हता. त्यामुळे  मलमार्गातून या बॅटरी आपोआप बाहेर निघतील असं दिसून आलं. सुरुवातीच्या आठवड्यात महिलेने गुद्द्द्वारातून काही बॅटरी बाहेर काढल्या पण बाकी अडकून राहिल्या. पोटातील वेदना अधिक वाढल्या. डॉक्टरांनी पाहिलं की तिच्या पोटातील बॅटरीचा भार प्युबिक बोनच्या वर लटकत होता. तेव्हा त्यांनी बॅटरी सर्जरी करून काढण्याचा निर्णय घेतला. 46 बॅटरी डॉक्टरांनी ऑपरेशन करून बाहेर काढल्या. पण 4 बॅटरी मलायशयात गेल्या होत्या आणि तिथंच अडकल्या. डॉक्टरांनी त्या खेचून बाहेर काढल्या. अशा पद्धतीने एकूण 55 बॅटरी काढण्यात आल्या. बॅटरी महिलेच्या पोटातून बाहेर काढण्यात डॉक्टरांनाही घाम फुटला. हे वाचा - बायकोने स्पर्श करताच चमत्कार! अचानक धडधडू लागलं हृदय, जिवंत झाला मृत नवरा लाइव्ह सायन्सच्या रिपोर्टनुसार आयरिश मेडिकल जर्नलमध्ये हा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार हे असं पहिलंच प्रकरण आहे, ज्यात इतक्या प्रमाणात बॅटरी गिळण्यात आल्या.
First published:

Tags: Health, Lifestyle, Viral

पुढील बातम्या