मुंबई, 28 फेब्रुवारी : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कचरा गोळा करणाऱ्या तरुणाला काही जणांनी मिळून अत्यंत वाईट शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आहे. जे हातात मिळेल ते घेऊन तिथल्या लोकांनी त्याला मारहाण केली. तरीही हा तरुण एकही शब्द न बोलता शांतपणे कचरा वेचत राहिला. मग संतप्त तरुणाने काठीने या तरुणाला हुसकवून लावण्यास सुरुवात केली. ही घटना आहे सॅन फ्रान्सिसको इथली. जमावानं मारहाण करण्यास सुरुवात केल्यानंतर हा तरुण तिथून निघून गेला मात्र माणसाच्या क्रूरतेचं दर्शन करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीनं या तरुणासोबत वर्तन केलं जात आहे.
हा व्हिडिओ आतापर्यंत 35 लाखहून लोकांनी पाहिला असून 77 हजार हून अधिक लाईक केले आहेत. बिचारा गरीब तरुण अशा पद्धतीच्या युझर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही युझर्सनी अशा पद्धतीनं वागणाऱ्या तरुणांवर कारवाई करायला हवी असंही म्हटलं आहे. लोकांमध्ये दया आणि करूणाच उरली नाही का? असा सवालही काही युझर्सनी उपस्थित केला आहे. शांतपणे कचरा गोळा करणाऱ्या या तरुणाला मारहाण करणाऱ्या विकृतांविरोधात कारवाई होणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. हेही वाचा- VIDEO: नजर हटी, दुर्घटना घटी; भरधाव ट्रकच्या धडकेत बाईकचा चुराडा, तिघांचा मृत्यू हेही वाचा- VIDEO : धक्कादायक! थुंकण्यासाठी उठलेल्या तरुणाच्या डोक्यात कोसळला स्लॅब

)







