Home /News /viral /

13 फूट मगरीच्या पोटात आढळली 5 हजार वर्ष जुनी वस्तू; पाहताच हैराण झाला शिकारी

13 फूट मगरीच्या पोटात आढळली 5 हजार वर्ष जुनी वस्तू; पाहताच हैराण झाला शिकारी

शेन स्मिथकडे जॉन हॅमिल्टन नावाचा आणखी एक शिकारी 13 फूट लांब मगर (13 feet long alligator) घेऊन पोहोचला तेव्हा शेन हैराण झाले. मात्र, शेन यापेक्षाही जास्त तेव्हा हैराण झाले, जेव्हा त्यांनी या मगरीचं पोट फाडून पाहिलं.

    नवी दिल्ली 13 सप्टेंबर : जंगली प्राणी (Wild Animals) अनेकदा इकडे-तिकडे फिरताना अशा काही वस्तू खातात ज्याचा त्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो. सध्या अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका मगरीच्या (alligator) पोटात अनेक वर्ष जुनी अशी वस्तू आढळली जी पाहून सगळेच हैराण झाले. या मगरीचं पोट फाडलं असता त्यात अत्यंत खास वस्तू आढळली. VIDEO: इवल्याशा कुत्र्याची घोड्यासोबत जमली गट्टी; अनोखी मैत्री जिंकतीये मनं शेन स्मिथ एक हंटर आहेत जे मोठ्या प्राण्यांची चिरफाड करतात. त्यांचं प्रोसेसिंग प्लांट (Processing Plant) या प्राण्यांची चिरफाड केल्यानंतर त्यांच्या शरीराचा वापर वेगवेगळं सामान बनवण्यासाठी करतं. शेन स्मिथकडे जॉन हॅमिल्टन नावाचा आणखी एक शिकारी 13 फूट लांब मगर (13 feet long alligator) घेऊन पोहोचला तेव्हा शेन हैराण झाले. मात्र, शेन यापेक्षाही जास्त तेव्हा हैराण झाले, जेव्हा त्यांनी या मगरीचं पोट फाडून पाहिलं. शेनला मगरीच्या पोटातून एक बाण आणि एक प्लूमेट (एक प्रकारचे हत्यार) सापडले. शेनला वाटलं, की मगरीने ते खाल्ले असावे, पण जेव्हा तज्ञांनी तपासणी केली तेव्हा कळले की बाण 5000 ते 6 हजार वर्षे जुना आहे. तो बाण जमिनीवर पडला असावा आणि मगरीने तो गिळला असावा असा अंदाज आहे. शेनच्या प्रोसेसिंग प्लांटनेही फेसबुकवर या मगरीचे फोटो टाकून याबाबत माहिती दिली. इतिहासकारांनी शेनला सांगितलं, की बाण आणि प्लमेट्स मूळ अमेरिकन लोकांद्वारे मासेमारीसाठी वापरले गेले असावेत. याशिवाय मगरीच्या पोटात माशांची हाडे, पक्ष्यांचे पंख, चेंडू देखील आढळले.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crocodile, Viral news

    पुढील बातम्या