नवी दिल्ली 25 मे : मद्यप्रेमी वेगवेगळ्या ब्रँडला पसंती देतात. काही लोक आहेत ज्यांना जुनी वाईन आवडते, तर काही लोकांना नेहमी नवीन ट्रेंडमध्ये सामील व्हायला आवडतं. पण तुम्हाला माहीत आहे का, की कधी कधी खूप जुनी दारू खूप महाग विकली जाते. याचं आणखी एक उदाहरण म्हणजे, नुकतंच एका व्यक्तीने 50 वर्षे जुनी दारू लाखोंना विकली. एवढंच नाही तर या दारूच्या बाटलीचा लिलाव करण्यात आला आहे.
ही घटना अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील आहे. येथे राहणाऱ्या मार्क पॉलसन नावाच्या व्यक्तीने 50 वर्षे जुनी दारूची बाटली ठेवली होती. या व्यक्तीने ही दारू 1970 मध्ये विकत घेतली होती आणि ती अजूनही त्याच्याकडेच पडून होती. एके दिवशी हा व्यक्ती एका लिलावगृहात गेला आणि त्याने सांगितलं की त्याच्याकडे 50 वर्षे जुनी वाईनची बाटली आहे, जी कधीही उघडली नाही आणि अजूनही बंद आहे.
जुनी वाईन इतकी महाग का असते? प्रोसेस वाचून म्हणाल त्यामानाने स्वस्त आहे
त्यानंतर ही दारूची बाटली लवकर आणा, असं लिलावगृहाकडून त्याला सांगण्यात आलं. हा व्यक्ती दारूची बाटली घेऊन पोहोचला. वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार दारूच्या बाटलीचा एक लाख डॉलर्समध्ये लिलाव झाला. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम 87 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
दारूची बाटली इतकी महागात विकली जाईल, अशी या व्यक्तीला अपेक्षा नव्हती. रिपोर्टनुसार, ही व्यक्ती एक कलाकार होती आणि त्याला खूप पूर्वीपासून विंटेज वाईनमध्ये खूप रस होता. त्यावेळी त्याने ही दारूची बाटली ठेवली होती जी आजपर्यंत त्याच्याकडे होती. ही दारूची बाटली La Tache नावाच्या ब्रँडची असल्याचं सांगण्यात येत आहे. ही एक अतिशय खास वाइन मानली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news, Wine