वॉशिंग्टन, 06 जून : काही वेळा अशा घटना घडतात, ज्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. अशीच एक आश्चर्यकारक घटना सध्या चर्चेत आली आहे. एक महिला जिने प्रेग्नन्सी साठी बरेच प्रयत्न केले पण ती प्रेग्नंट होत नव्हती. ती वयाच्या अशा टप्प्यावर होती की डॉक्टरांनीही तिला मूल होणार नाही, असं सांगितलं होतं. पण तिने एक व्हिडीओ पाहिला आणि चमत्कार झाला. व्हिडीओ पाहिल्यानंतर ती चक्क प्रेग्नंट राहिली. अमेरिकेतील ही घटना आहे. पेनसिल्व्हेनिया राहणारी कॅरिन रॉकिंड आणि तिचा नवरा जोश क्लुरे यांनी लग्नानंतर मूल होण्यासाठी बरेच प्रयत्न केले. 5 वर्षे ते नैसर्गिक गर्भधारणा होते का ते पाहत होते. पण काही ना काही अडचण येत होती. दोनदा गर्भपातही झाला. शेवटी त्यांनी आयव्हीएफ करून पाहण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेसाठी त्यांनी 40,000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 33 लाख रुपये खर्च केले. यासाठी त्यांनी कर्ज घेतलं होतं. एका दुसऱ्या पुरुषाचे एग्ज घेऊन गर्भधारणा होते हा ते पाहण्यात आलं. पण गर्भाची निर्मिती झाली नाही आणि हा प्रयत्नसुद्धा फसला. कोणत्याही पुरुषाशी शारीरिक संबंध नाही, व्हर्जिन तरुणी प्रेग्नंट; कारणही शॉकिंग आता सर्व संपलं, काहीच होणार नाही. असं या दाम्पत्याला वाटत होतं. त्याचवेळी एक आशेचा किरण गवसला. कॅरिनला एक युट्यूब व्हिडीओ सापडला. ज्यात एका महिलेने प्रेग्नन्सीसाठी व्हायग्रा घेतल्याचा दावा केला. पुरुषांसाठी असलेल्या या औषधामुळे तिच्या गर्भाशयाचं अस्तर वाढण्यास मदत झाल्याचं ती म्हणाली. दुसऱ्या एका महिलेच्या सासूनेही आपण सुनेसाठी हा उपाय केला आणि काही आठवड्यांनंतर ती प्रेग्नंट झाल्याचं म्हटलं. कॅरिन म्हणाली, मी आधीच खूप दुःखी होते. मला मूल हवं होतं. गरोदर व्हायचं होतं. त्यामुळे मी हे करू शकते, यावर विश्वास होता. त्यामुळे मी ही पद्धत अवलंबवण्याचं ठरवलं. बर्थ कंट्रोल पिल, कंडोम नव्हतं तेव्हा…; प्रेग्नन्सी रोखण्यासाठी 8 भयंकर पद्धती तिने डॉक्टरांकडे जाऊन प्रेग्नन्सीसाठी व्हायग्राच्या या उपायाबाबत सांगितलं. पण डॉक्टरांनी स्पष्ट नकार दिला. त्यांना हसू आलं. पण तरी तिने हा उपाय केला आणि अखेर ती प्रेग्नंट राहिली. नऊ महिन्यांनंतर तिने एका मुलाला जन्म दिला. या दाम्पत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.