मुंबई 24 जून: लहान मुलं (Children) फारच निरागस असतात. परंतु, कोणतीही गोष्ट पटकन आत्मसात करण्याची त्यांची क्षमता वाखाणण्यासारखी असते. खासकरुन आजच्या काळातील लहान मुलं आपल्या पालकांचा मोबाईल (Mobile) हाताळून काही गोष्टी लवकर शिकतात. परंतु, असं करत असताना या लहान मुलांकडून अशी काही कृती होते की ती पाहून त्यांचे पालक बुचकळ्यात पडतात. अशीच काहीशी कृती 4 वर्षांच्या एका मुलीने केली. तिने वडिलांचा मोबाईल घेऊन फूड पार्सल (Food Parcel) ऑर्डर केले. मात्र या पार्सलचे बिल पाहून तिच्या आई-वडिलांनी डोक्यावर हात मारुन घेतला. याबाबतचा व्हिडीओ फॅंग नावाच्या व्हिडीओ चॅनेलने (Video Channel) आपल्या पेजवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत असून लोकांची त्याला पसंती मिळत आहे. लेक म्हणे, ‘अरेंज नको लव्ह मॅरेज हवं’; आईच्या जबरदस्त उत्तराने मुलीची बोलती बंद ही घटना चीनमधील (China) आहे. या व्हिडीओ दिसणाऱ्या 4 वर्षांच्या मुलीला खूप भूक लागली म्हणून तिने वडिलांच्या मोबाईल फोनवरुन ऑनलाइन फूड डिलिव्हरी (Online Food Delivery) ऑर्डर केली. तिने सोयाबीन पेस्टसह नुडल्स ऑर्डर केले. मात्र या लहान मुलीकडून ऑर्डर करताना एक चूक झाली. तिने एक नूडल्स (Noodles) मोबाईल टाईप करताना चुकून त्यापुढे 2 शून्य अधिक टाईप केले. त्यामुळे संबंधित फूड कंपनीकडे एक नूडल्स बाऊल ऐवजी 100 नूडल्स बाऊल ऑर्डर नोंद झाली. ही ऑर्डर पाहताच संबंधित कंपनीला वाटले की कदाचित पार्टी ऑर्डर असावी. परंतु, कंपनीचा डिलिव्हरी बॉय जेव्हा ही ऑर्डर घेऊन संबंधित मुलीच्या घरी पोहोचला तेव्हा तिच्या पालकांनी ऑर्डर पाहून डोक्यावर हात मारुन घेतला. कारण हा डिलिव्हरी बॉय एका नूडल्स बाऊल ऐवजी 100 नूडल्स बाऊल घेऊन आला होता. या कुटुंबाचे संपूर्ण घर या बाऊल्सने भरुन गेले. या ऑर्डरच्या बिलापोटी जेव्हा 15 हजार रुपये देण्याची वेळ आली तेव्हा या मुलीच्या वडिलांना धक्का बसला. परंतु, आपल्या लहान मुलीची ही निरागस कृती आणि तिचं स्मित हास्य यामुळे वडिलांचा राग क्षणात निवळला. एवढे नूडल्स आपण खाऊ शकणार नाही, हे लक्षात घेऊन या कुटुंबाने 8 नुडल्स बाऊल स्वतःसाठी ठेवत बाकीचे नूडल्स बाऊल गरजू कर्मचाऱ्यांना वाटप केले. या कुटुंबाच्या दातृत्वाचे कौतुक होत आहे. 264 झूम मिटिंगला महिलेनं घातलं एकच शर्ट; पण शेवटच्या दिवशी झालं असं की…
हा व्हिडीओ सोशल मीडिया वर जोरदार व्हायरल झाला असून, लोक त्यावर प्रतिक्रिया किंवा कमेंट नोंदवत आहेत. काही लोक या निरागस मुलीच्या कृतीवर हसत आहेत तर काही लोकांनी लहान मुलं मोबाईलचा अशा प्रकारे वापर करुन धोकादायक स्थिती निर्माण करु शकतात, त्यामुळे पालकांनी सावध राहावे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.