मुंबई, 24 जून: आपलं एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे. आपल्याला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे, आपल्याला अरेंज नाही (Arranged marriage) लव्ह मॅरेज (Love marriage) करायचं आहे. असं मुलांनी सांगितल्यावर त्यावर भारतीय पालकांची प्रतिक्रिया काय असते, हे प्रत्येकालाच माहिती आहे. मग तो पालक अशिक्षित असो किंवा सुशिक्षित, गरीब असो किंवा श्रीमंत. जेव्हा मुलांच्या लग्नाचा विषय येतो तेव्हा लव्ह मॅरेजसाठी तर बहुधा सुरुवातीला नकारच असतो. लव्ह मॅरेज करण्यासाठी कित्येकांना कितीतरी पापड बेलावे लागतात. अशाच लव्ह मॅरेजबाबत एका मायलेकीचा (Mother daughter video) मजेशीर व्हिडीओ (Funny video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होते आहे.
लेकीने आपल्याला अरेंज नाही लव्ह मॅरेज करायची आहे, अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर तिच्या आईने तिला जबरदस्त उत्तर दिलं आहे. आईने आपल्या उत्तराने मुलीची बोलतीच बंद केली आहे. यापुढे काय बोलावं असाच प्रश्न तिच्या लेकीला पडला. आईचं हे उत्तर नेटिझन्सच्याही पसंतीच पडत आहे.
View this post on Instagram
yourregularmom इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
हे वाचा - 'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल
व्हिडीओत पाहू शकता. एक महिला आपल्या मुलाशेजारी आहे. त्यांच्यासमोर तिची मुलगी आहे. मुलगी या व्हिडीओत दिसत नाही पण तिचा आवाज ऐकू येत आहे. मायलेकींमध्ये लग्नावरून संवाद सुरू आहे. मुलगी आपल्या आईला सांगते, "आई अरेंज नको लव्ह मॅरेज ठिक राहिल"
लेकीने असं म्हणतात आईने तिला मजेशीर उत्तर दिलं आहे. "मग आतापर्यंत तू बसून का राहिली आहेस. एकाही मुलाला आपल्या जाळ्यात ओढू शकली नाहीस", असं तिची आई तिला म्हणाली.
हे वाचा - 'आई माझ्या बाबांशी लग्न करशील का?', कधीच पाहिला नसेल असा प्रपोजचा CUTE VIDEO
मुलगी जितक्या बिनधास्तपणे आपल्या आईला प्रेमविवाह करायचं आहे तसं सांगते. अगदी तितक्याच बिनधास्तपणे तिची आई तिला त्यावर उत्तर देते. आईचं उत्तर ऐकून तिचा मुलगा आणि मुलगी दोघंही मोठ्याने हसू लागतात. आईलाही हसू आवरत नाही. देशी आईचा हा बिनधास्त अंदाज, तिचा अॅटिट्युड प्रत्येकाला आवडत आहे. कूल मॉम, अशी आई सर्वांना हवी अशा कितीतरी कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Viral, Viral videos, Wedding video