• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • 264 झूम मिटिंगला महिलेनं घातलं एकच शर्ट; पण शेवटच्या दिवशी झालं असं की...

264 झूम मिटिंगला महिलेनं घातलं एकच शर्ट; पण शेवटच्या दिवशी झालं असं की...

एका महिलेनं एक शर्ट तब्बल 264 वेळा घातल्याचं तुम्ही कधी ऐकलात का? एका महिलेनं हा प्रताप केला आहे. तिचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 जून: एका महिलेनं एक शर्ट तब्बल 264 वेळा घातल्याचं तुम्ही कधी ऐकलात का? हो.. एक अशी महिला आहे जिनं झूम मिटिंगमध्ये एकच शर्ट तब्बल 264 वेळा घातलं (Same shirt wore to 264 Zoom Meetings)आणि विशेष म्हणजे तिला कोणीच नोटीस केलं नाही. कंपनीतल्या एकही व्यक्ती ते ओळखू शकला नाही. जेम नावाच्या महिलेनं हा प्रकार केला आहे. (Watch Viral Video) 30 वर्षीय जेमनं तिच्या फॅशन एक्सप्रिमेंटबद्दल (Fashion Experiment) सोशल मीडियावर एक किस्सा शेअर केला आहे. गेल्या 15 महिन्यात तिनं कंपनीच्या प्रत्येक मिटिंगला एकच शर्ट घातलं. ब्लू कलरच हवाईयन शर्ट त्यावर फुल आणि अननसाचं चित्र आहे. (Blue Hawaiian shirt with flowers and pineapples) जेम म्हणाली, कोरोनाचा काळ सुरु झाल्यापासून कंपनीच्या प्रत्येक झूम मिटींगला मी एकच शर्ट घालत होती. मात्र कंपनीतल्या एकाही कर्मचाऱ्याला माझ्या कपड्याबद्दल समजलं नाही आणि कोणी त्यावर भाष्यही केलं नाही. मात्र कंपनीच्या शेवटच्या दिवशी ही गोष्ट मीच सर्वांना सांगितली. तिनं 2018 मध्ये गॅपमधून हा शर्ट विकत घेतला होता. 2 एप्रिल 2020 रोजी कोरोनाला सुरुवात झाल्यानंतरच्या पहिल्या व्हिडिओ मिटिंगला हा शर्ट घातला. त्यानंतर ती पुन्हा पुन्हा तोच शर्ट घालत राहिली. प्रत्येक मिटिंगला ती तोच शर्ट घालायची. हा प्रकार एकूण 264 मिटिंगमध्ये चालू राहिला. तिला अपेशा होती की कमीतकमी एका व्यक्तीच्या तरी ही गोष्ट लक्षात यावी. मात्र ही गोष्ट कोणाच्याही लक्षात आली नाही. आज 264 वी मिटिंग होती. जिथे मी पुन्हा तोच शर्ट घातला होता. कामावरचा माझा शेवटचा दिवस होता. जेव्हा मी माझ्या टीमला सांगितले की, मी प्रत्येक झूम मिटिंगला एकच शर्ट घातला. तेव्हा त्यांच्या काहीच लक्षात नाही आलं. त्यांना समजलंच नाही की मी नेमकं कशाबद्दल बोलत आहे. एवढे दिवस त्यांच्या लक्षात आले नव्हते, असं जेमनं सांगितलं आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: