भोपाळ 30 मार्च : जग आज भरपूर प्रगती करत आहे. भारतही यात मागे नाही. देशातील मोठमोठ्या शहरांमध्ये तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित झालं असून देशाने भरपूर प्रगती केली आहे. मात्र, आजही देशात अनेक अशी ठिकाणं आहेत, जिथे अगदी साध्या जीवनावश्यक सुविधाही पोहोचू शकलेल्या नाहीत. या सुविधांच्या अभावामुळे लोक अनेक समस्यांचा सामना करत आहेत. सध्या याचाच प्रत्यत देणाऱ्या एका घटनेचा व्हिडिओ (Shocking Video) समोर आला आहे. काळजाचा ठोका चुकवेल हे दृश्य; कधीच पाहिला नसेल इतका खतरनाक Bike Stunt Video या व्हिडिओमध्ये दिसतं, की 4 महिला आपल्या खांद्यावर एका वृद्ध महिलेचा मृतदेह घेऊन चाललेल्या आहेत. हा व्हिडिओ मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील रायपूर करचुलियन गावातील आहे. यात शववाहिनी उपलब्ध नसल्याने 4 महिलांनी महिलेचा मृतदेह खांद्यावर उचलून नेला मृतदेह खांद्यावर घेऊन या महिलांना तब्बल 5 किलोमीटर चालावं लागलं (4 Women Carried Body of Aged Lady on Shoulders for 5 Kms)
. #Shocking
— Manoj Sharma (@ManojSharmaBpl) March 30, 2022
As the hearse was unavailable, 4 women had to carry the body of an aged lady on their shoulders for 5 kms at Raipur Karchulian village in Rewa district of MP.@News18India @CNNnews18 pic.twitter.com/D0OmA2n2ru
. 80 वर्षीय वृद्ध महिलेची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबीयांनी रुग्णवाहिका बोलावली. अनेक तास प्रतीक्षा करूनही रुग्णवाहिका न आल्याने कुटुंबीयांनी महिलेला खाटेसह उचलून सामुदायिक आरोग्य केंद्रात नेलं. तिथे डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं. त्यानंतरही कुटुंबीयांचा त्रास कमी झाला नाही, कारण रुग्णवाहिकेनंतर कुटुंबीयांना शववाहिकाही मिळाली नाही. अखेर घरातील 4 महिला आणि एका मुलीने मिळून खांद्यावरच वृद्ध महिलेचा मृतदेह उचलून दोन तासात 5 किमी प्रवास केला आणि अखेर आपल्या घरी पोहोचले. एक आघात आणि कुटुंब विखुरलं; जवानाच्या आत्महत्येनंतर बायकोनं स्वत:ला पेटवलं, तर भावाला… आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, केवळ रेडक्रॉस जिल्हा मुख्यालयात शववाहिका दिली जाते. इतर ठिकाणी शववाहिकेची सोय नाही. रुग्णांना केवळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. मृत्यूनंतर प्रेत आपल्या परीने व्यवस्था करूनच घेऊन जावं लागतं.