मुंबई, 08 फेब्रुवारी : चिंपाझी (chimpanzee) हुबेहूब माणसांची नक्कल करण्यात तरबेज असतात. फिल्ममधून आपण त्यांचे असे बरेच व्हिडीओ पाहिले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ (video) सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होतो आहे. ज्यामध्ये काही जणांनी चक्क चिंपाझींच्या हातात मजेत बंदूक दिली आणि नंतर काय झालं ते तुम्हीच पाहा.
चिंपाझीनं बंदूक हातात घेतल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आयएफएस अधिकारी सुसांत नंदा यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
— Susanta Nanda IFS (@susantananda3) February 5, 2021
व्हिडीओत पाहू शकता. चार व्यक्ती आहेत. त्यांच्या हातात बंदूकही आहे. त्यातील एक व्यक्ती चिंपाझीच्या हातात बंदूक देते. त्यावेळी दुसरी व्यक्ती तिला असं करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करते पण तरी ती व्यक्ती चिंपाझीला बंदूक देते. चिंपाझीच्या हातात बंदूक दिल्यावर चौघंही जोरजोरात हसतात.
हे वाचा - पिल्लाला वाचवण्यासाठी मगरीच्या जबड्यात गेली आई; मन हेलावणारा VIDEO
चिंपाझीची चेष्टा करत असतात. एक व्यक्ती तर आपल्या हातात बंदूक घेऊन चिंपाझीला अॅक्शनही करून दाखवतो. काही वेळातच चिंपाझी बंदुकीतून एक गोळी झाडतो. त्यावेळी चौघंही शॉक होतात. मग काय चिंपाझी आपली बंदूक फिरवतो धाड धाड गोळ्या झाडत सुटतो. तेव्हा मात्र त्याला चिडवणारे चौघंही तिथून घाबरून धूम ठोकतात.
हे वाचा - Shocking! पाहता पाहता निर्जीव पुतळे बनले जिवंत प्राणी; VIDEO पाहूनच हादराल
व्हिडीओ शेवटचा क्षणही जास्त लक्ष वेधून घेतो. जसा योद्धा जिंकल्यानंतर आपल्या दोन्ही हातात बंदूक धरून हात वर करतो, अगदी तसंच हा चिंपाझीदेखील करतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral