मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Shocking! नागपुरात चिमुकल्यांच्या प्ले एरियात घुसून अजगराने केली शिकार; अंगावर काटा आणणारा VIDEO

Shocking! नागपुरात चिमुकल्यांच्या प्ले एरियात घुसून अजगराने केली शिकार; अंगावर काटा आणणारा VIDEO

नागपुरात शेतात सापडला महाकाय अजगर.

नागपुरात शेतात सापडला महाकाय अजगर.

शेतात लहान मुलांसाठी खेळण्यासाठी असलेल्या जागेत हा भलामोठा अजगर सापडला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India
  • Published by:  Priya Lad

रवी गुलकरी/नागपूर, 29 सप्टेंबर : तसे सोशल मीडियावर अजगराचे व्हिडीओ कमी नाहीत. अजगराच्या शिकारीचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओत अजगरांना पाहिलं तरी घाम फुटतो. अशाच अवाढव्य अजगराने नागपुरात शिकार केली आहे. शेतात असलेल्या चिमुकल्यांच्या प्ले एरियात घुसून अजगराने शिकार केली. अंगावर काटा आणणारा असा हा व्हिडीओ आहे.

नागपूरच्या रांटेर तालुक्यातील खुमारी गावातील ही घटना. इथल्या शेतात एक अजगर घुसला. शेतातील एका भागात लहान मुलांना खेळण्यासाठी जागा होती. तिथं एका ठिकाणी हा अजगर निवांत बसला होता. त्याचं पोट फुगलेलं होतं. म्हणजेच त्याने नुकतीच कुणाची तरी शिकार केली होती. एका लाकडी बॉक्सच्या आत हा अजगर शांत बसला होता. त्याला पाहून नागरिकही घाबरले.

हे वाचा - VIDEO - विद्यार्थिनीच्या बॅगेतून येत होता विचित्र आवाज; उघडताच शिक्षकांनाही फुटला घाम

त्यानंतर वाइल्ड चॅलेंज ऑर्गनायझेशनला याची माहिती देण्यात आली. संस्थेची टीम तात्काळ घटनास्थळी आली.  त्यांनी अजगराला तिथून बाहेर काढलं. त्यावेळी अजगर हल्ला करतानाही दिसतो आहे. थोड्यावेळाने त्याने उलटी केली आणि पोटातील शिकार जशीच्या तशी बाहेर काढली. त्याने जे गिळलं होतं, ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

त्याच्या पोटातून तब्बल 2 ससे बाहेर पडले. अगदी जसेच्या तसे हे ससे त्याने उलटी करून बाहेर फेकले. पण त्यांचा मृत्यू झाला होता.

हे वाचा - VIDEO - झेब्रा बनून प्राण्यांच्या कळपात घुसले तरुण; सिंहांच्या तावडीत सापडले आणि 16 सेकंदातच...

हा रॉक पायथॉन आहे. जवळपास 10-11 फूट लांबीचा हा अजगर आहे. हे अजगर विषारी नसतात. पण ते इतके मोठे असतात की माणसांनाही गिळंकृत करतात, असं सांहितलं जातं. भारतातील बऱ्याच ठिकाणी या प्रजातीचे अजगर आहेत. जिथं दगडं असतात तिथंच हे अजगर दिसून येतात.

First published:

Tags: Nagpur, Python, Viral, Viral videos