मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

प्रेम खरंच आंधळं असतं! 3 फुटांपेक्षा कमी उंचीच्या महिलेचं 13 वर्षांनी लहान तरुणावर जडलं प्रेम; आता होताहेत ट्रोल

प्रेम खरंच आंधळं असतं! 3 फुटांपेक्षा कमी उंचीच्या महिलेचं 13 वर्षांनी लहान तरुणावर जडलं प्रेम; आता होताहेत ट्रोल

या कपलला सोशल मीडियावर (Social Media) जोरदार ट्रोल (Troll) केलं जात आहे.

या कपलला सोशल मीडियावर (Social Media) जोरदार ट्रोल (Troll) केलं जात आहे.

या कपलला सोशल मीडियावर (Social Media) जोरदार ट्रोल (Troll) केलं जात आहे.

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी:  प्रेम (Love) ही सहजसुलभ भावना असते. प्रेमाला कोणत्याच गोष्टींचं बंधन नसतं. व्हॅलेंटाइन डे (Valentine's Day) हा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी कपल्स (Couples) एकमेकांविषयी मनात असलेलं अव्यक्त प्रेम व्यक्त करतात, नव्या जीवनाला सुरुवात करतात. सध्या अमेरिकेतली (America) एक महिला आणि तिचा बॉयफ्रेंड प्रेम या विषयावरून जोरदार चर्चेत आहे. अर्थात यामागे महिलेची उंची (Physique) आणि तिचं प्रोफेशन या गोष्टी कारणीभूत आहेत. त्यातच या महिलेचा बॉयफ्रेंड तिच्यापेक्षा 13 वर्षांनी लहान आहे. त्यामुळे या कपलला सोशल मीडियावर (Social Media) जोरदार ट्रोल (Troll) केलं जात आहे. याविषयीचं वृत्त 'आज तक'ने दिलं आहे. अमेरिकेतली 32 वर्षांची सॅसी केसी (Sassee Cassee) आणि तिचा बॉयफ्रेंड ब्लेक (Blake) या कपलवर सध्या जोरदार टीका होत आहे. सॅसीची उंची केवळ 2 फूट 10 इंच आहे तर तिचा बॉयफ्रेंड ब्लेकची उंची 5 फूट 7 इंच आहे. तसं पाहायला गेलं, तर शारीरिकदृष्ट्या ती दोघं एकमेकांना अनुरूप नाहीत. सॅसी एका बारमध्ये नोकरी करते. कमी उंची असलेल्या सॅसीचा बॉयफ्रेंड तिच्यापेक्षा 13 वर्षांनी लहान आहे. त्यामुळे अशा दोन्ही कारणांनी हे कपल ट्रोल होत आहे. Video : हुंड्यात म्हणे ट्रेन देणार होते सासरे, नकाराचं कारण ऐकून पोट धरून हसाल आपल्या नात्याविषयी सॅसी म्हणते, की 'माझं ब्लेकवर जीवापाड प्रेम आहे. ब्लेक माझी काळजी घेतो. गेल्या वर्षी फेसबुकवर (Facebook) आमची ओळख झाली होती. एक महिना डेटिंग केल्यानंतर आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षभरापासून आम्ही दोघं एकत्र राहत आहोत.' 'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, सॅसी लहान असताना, डॉक्टरांनी तिला Cartilage-Hair Hyperplasia हा आजार असल्याचं निदान केलं. या आजारात हाडांची लांबी वाढत नाही. त्यामुळे माणसाची उंचीदेखील वाढत नाही. सॅसीची उंची सामान्य व्यक्तीच्या तुलनेत खूपच कमी आहे; पण तिनं कधीच या आजाराला (Disease) आपली कमजोरी बनू दिली नाही. इन्स्टाग्रामवर सॅसी केसीचे (sasseecassee89) दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवरचे (Instagram) तिच्या फोटोज आणि व्हिडिओजवर हजारो-लाखो जण प्रतिक्रिया देत असतात. जिवंत कुत्र्यांना मगरीच्या हवाली केलं; क्षणात झाला अंत, संतापजनक VIDEO 'आमच्या नात्यावरून लोक आम्हाला ट्रोल करत आहेत', असं या कपलनं म्हटलं आहे. सोशल मीडियावर त्यांना खूप द्वेषपूर्ण कमेंट्सचा सामना करावा लागत आहे. असं असूनही सॅसी आणि ब्लेक एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. हे दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतात. तसंच ब्लेक सॅसीशी लग्न करू इच्छित आहे. 'सॅसी ही खूप हळव्या स्वभावाची स्त्री आहे. ती मला आनंदी ठेवते, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मला तिच्या कमी उंचीची, माझ्या वयाची आणि तिच्या नोकरीची पर्वा नाही,' असं ब्लेक नमूद करतो. एकमेकांच्या सहवासात आनंदी असलेल्या कपलला मात्र इतरांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे.
First published:

Tags: Love at first sight, Valentine day, Viral news

पुढील बातम्या