• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • बोट बुडतानाचा भयानक Live Video; जीव वाचवण्यासाठी लोकांच्या किंकाळ्या अन् आरडाओरड

बोट बुडतानाचा भयानक Live Video; जीव वाचवण्यासाठी लोकांच्या किंकाळ्या अन् आरडाओरड

जोरहाटमध्ये 120 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या दोन बोटी ब्रह्मपुत्रा नदीमध्ये एकमेकांना धडकल्या.

 • Share this:
  आसाम, 09 सप्टेंबर: आसामच्या (Assam) जोरहाटमध्ये 120 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या दोन बोटी ब्रह्मपुत्रा नदीमध्ये एकमेकांना धडकल्या. ज्यानंतर तिथे बोटीचा भीषण (Boat Accident) अपघात झाला. अपघातानंतर 65 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर अंगावर काटा उभा राहतो. या व्हिडिओत दिसतंय की, लोकं स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत. त्यासाठी ते थेट पाण्यात उडी घेत आहेत. व्हिडिओत आपण बघू शकतो. बोट हळूहळू पाण्याखाली जात आहे. हेही वाचा- 400 हून अधिक लोकांची चौकशी, 150 CCTV कॅमेऱ्यांचा तपास; आरोपी निघाला मुलगाच या व्हिडिओमध्ये लोक बोटीच्या डेकवर धावताना दिसत आहेत. त्यात लोकांच्या ओरडण्याचा आवाज येत आहे. काही जण स्वतः जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेताना ही दिसत आहेत. सुमारे 82 लोकांचं यशस्वी रेस्क्यू आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मते, 82 लोक या दुर्घटनेतून वाचले असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. निमाटी घाटातून माजुलीकडे जाणारी 'मा कमला' नावाची खासगी बोट बेटावरून येणाऱ्या 'ट्रिपकाई' बोटीला धडकल्याने हा अपघात झाला. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि राज्य अग्निशमन दलाची टीम अजूनही आसाममधील निमाटी घाटाजवळ बेपत्ता लोकांच्या रेस्क्यू ऑपरेशन करत आहे. भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलही आज Advance यंत्रांसह बचाव कार्यात सामील होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम सरकारला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिलं आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: