नवी दिल्ली 26 फेब्रुवारी : आजच्या तरुणाईची सर्वात मोठी कमतरता म्हणजे ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे मोबाईल आणि व्हिडिओ गेम्समध्ये जास्त वेळ घालवणं. तंत्रज्ञानाने मुलांना इतकं डिस्टर्ब केलं आहे की, ती त्यांची सवय बनवली आहे आणि ते काही क्षणही त्यापासून दूर राहू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, जेव्हा कोणी त्यांना जबरदस्तीने त्याच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतं तेव्हा ते संतप्त होतात. नुकतंच अमेरिकेतून असंच एक प्रकरण समोर आलं. यात एक विद्यार्थी त्याच्याकडून त्याचा व्हिडिओ गेम हिसकावून घेतल्याने संतापला होता. त्यानंतर त्याने असं कृत्य केलं, जे जाणून तुम्हाला धक्का बसेल. Shocking Video : धबधब्यावर उलटी होऊन स्टंट करत होती तरुणी, तोल गेला अन्… मारामारीशी संबंधित आश्चर्यकारक व्हिडिओ अनेकदा @FightHaven या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केले जातात. या अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दोन लोकांमध्ये जोरदार भांडण होत आहे. प्रथमदर्शनी तुम्हाला असं वाटेल की कदाचित एखादा तरुण गुन्हेगाराला अशा प्रकारे मारहाण करत असेल. पण या व्हिडिओचं सत्य काही वेगळंच आहे.
खरं तर, हायस्कूलचा एक मुलगा वर्गात व्हिडिओ गेम खेळत होता. हे पाहून महिला शिक्षिकेला राग आला आणि तिने व्हिडिओ गेम हिसकावून घेतला. यामुळे विद्यार्थी चिडला. तो धावत शिक्षिकेकडे आला आणि तिच्यावर लाथा-बुक्क्यांचा वर्षाव केला. शिक्षिका जमिनीवर पडली, पण मुलगा थांबला नाही. त्याने एवढा हल्ला केला की शिक्षिका अर्धमेली झाली. हा मुलगा थांबण्याच्या मनःस्थितीत नव्हता, मात्र उपस्थित लोकांनी त्याला पकडून दूर खेचलं, तेव्हाच शिक्षिकेचा जीव वाचला. स्वॅगच्या नादात तरुणी क्षणात गार, खूर्चीवर चढली आणि…. मजेदार Video Viral या व्हिडिओला 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ही घटना फ्लोरिडातील मॅटेंजा हायस्कूलमधील असून विद्यार्थ्याचं वय अवघं १७ वर्षे आहे. विद्यार्थ्याला तत्काळ अटक करून बाल न्याय विभागात नेण्यात आलं. व्हिडिओवर कमेंट करताना लोकांनी म्हटलं की, या पिढीतील मुलांना शाळेतून काढून टाकलं पाहिजे. एकाने म्हटलं की, तिथून जाणारी महिलाही विचित्र आहे, तिने मध्ये बचाव करून विद्यार्थ्याला थांबवलं नाही.