मुंबई, 25 फेब्रुवारी : सोशल मीडिया एक मनोरंजनाचं प्लॅटफॉर्म आहे. येथे नेहमीच मनोरंजन व्हिडीओ व्हायरल होत असतात. तर काही व्हिडीओ हे थरारक घटनेचे असतात. येथे काही लोक प्रसिद्धीसाठी देखील व्हिडीओ अपलोड करतात. यांपैकी काही व्हिडीओ हे खरे असतात, तर काही तयार केलेले असतात. आजकाल तर काही तरुण मंडळी प्रसिद्धीसाठी किंवा काही व्ह्यूजसाठी स्वत:चा जीव देखील धोक्यात टाकतात. ज्यामुळे अनेक अपघात देखील घडतात. असाच एका अपघात एका तरुणीसोबत घडला, पण हा अपघात तसा फारसा गंभीर नाही, त्यामुळे हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्की हसू येईल पण या तरुणीला दुखापत झाली असणार हे नक्की. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नवरा-बायको भांडणाच्या नादात खिडकीतून पडले खाली, Video अंगावर काटा आणणारा या तरुणीने स्वॅग दाखवत एक व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा हा प्रयत्न फसला.
खरंतर एक तरुणी समोर दोन खुर्च्या ठेवून त्याच्या टोकावर चढून दुसऱ्या खूर्चीवर जाण्याचा प्रयत्न करत होती. तिचा पहिला प्रयत्न यशस्वी ठरला आणि ती एका खूर्चीवरुन दुसऱ्या खूर्चीवर गेली देखील. पण जेव्हा तिने दुसऱ्या खूर्चीवर पाय ठेवला आणि तिला झोपवून खाली उतरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र तिचा प्रयत्न फसला आणि ती तोल जाऊन खाली पडली.
या तरुणीने आपला स्वॅग दाखवण्याचा प्रयत्न केला, पण तो काही तिला जमला नाही आणि ती स्वत:च्या तोंडावर पडली. हा व्हिडीओ memecentral.teb नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो पाहून तुम्हाला देखील नक्कीच हसू येईल. अनेक युजर्सने यावर वेगवेगळे कमेंट्स केले आहेत. एकाने तर मजेदार कमेंट करत लिहिलं की ‘‘पापांच्या परीला उडता आलं नाही.’’ तर दुसऱ्याने ‘आमचं मनोरंज केल्याबद्दल धन्यवाद’ असं म्हटलं आहे.