मराठी बातम्या /बातम्या /Viral /14 श्वानांनी मिळून मालकासोबत असं काही केलं की जगभर चर्चा; VIDEO पाहून सर्वजण थक्क

14 श्वानांनी मिळून मालकासोबत असं काही केलं की जगभर चर्चा; VIDEO पाहून सर्वजण थक्क

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

बर्लिन, 02 फेब्रुवारी : बऱ्याच लोकांकडे श्वान असतात. तुमच्याकडेही कदाचित असेल. काही जणांना श्वान इतके आवडतात की त्यांच्याकडे श्वानांची फौजच असते. मग या श्वानांना सर्वकाही शिकवलं जातं. त्यानुसार ते वागतात. अशाच श्वानांनी मिळून त्यांच्या मालकांसोबत असं काही केलं आहे की त्याची जगभर चर्चा होते आहे. तब्बल 14 श्वान आणि त्यांच्या मालकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

वोल्फगँग लॉनबर्गर असं या व्यक्तीचं नाव आहे. जर्मनीत राहणारा वोल्फगँग ज्याच्याजवळ श्वानांची फौज आहे. त्याच्याकडे 14 श्वान आहेत.  एम्मा, फिलौ, फिन, साइमन, सूसी, माया, उल्फ, स्पेक, बीबी, केटी, जेनिफर, एल्विस, चार्ली आणि कॅथी ही त्यांची नावं. या सर्वांसोबत मिळून वोल्फगँगने असं काही करून दाखवलं आहे की त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

हे वाचा - नादच करायचा नाय! पठ्ठ्याने पाळलाय तब्बल 20 कोटींचा Dog; खासियत काय तुम्हीच पाहा

वोल्फगँगने आपल्या श्वानांना रस्त्यावर आणलं. सर्वात मोठ्या श्वानाचे पुढील दोन्ही पाय त्याने आपल्या हातात धरले आणि त्याला मागील दोन पायांवर उभं केलं. त्यानंतर त्या श्वानाच्या मागे दुसरा श्वान आपले पुढील दोन्ही पाय त्याच्या पाठीवर ठेवून मागील दोन पायांवर उभा राहिला. असं करत सर्व श्वान एकामागो एक अशाच पद्धतीने रांगेत उभे राहिले.  वोल्फगँगनंतर त्यांना चालवत घेऊन गेला. तसे श्वान खाली न पडता आहे त्याच स्थितीत रांगेत पुढेपुढे सरकले.

वोल्फगँग आणि त्यांच्या श्वानांच्या या करतबाची दखल गिनीज वर्ल्डनेही घेतली. त्यांनी जे करतब करून दाखवलं त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. गिनीज बुकमध्ये याची नोंद झाली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअऱ करण्यात आला आहे.

हे वाचा - तरुणींना पाहताच आऊट ऑफ कंट्रोल झाला रेडा; पुढे जे घडलं ते धक्कादायक; पाहा VIDEO

वोल्फगँग आणि त्यांच्या श्वानांनी जे केलं आहे त्याला कोंगा लाइन म्हणतात. कोंगा एक लॅटीन अमेरिकी डान्स आहे. ज्यात एकामाग एक रांगेत उभं राहतात. व्हिडीओत वोल्फगँग श्वानांना कोंगा बनवण्याचा निर्देश देताना दिसत आहेत.

दरम्यान सर्वाधिक श्वानांची कोंगा लाइन बनवण्याचा याआधीचा वर्ल्ड रेकॉर्ड वोल्फगँग यांची मुलगी एलेक्सा लॉनबर्ग हिच्या नावे होता. वोल्फगँग यांनी आता आपल्याच मुलीचा रेकॉर्ड मोडला आहे. तसंच त्यांनी आपल्या श्वानांसह केलेला हा पहिला रेकॉर्ड नाही. तर याआधी त्यांनी एका मिनिटात एका श्वानामार्फत सर्वाधिक रोलओव्हरटाही वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे.

First published:

Tags: Dog, Pet animal, Record, Viral, Viral videos, World record