मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बापरे! बाथटबमध्ये होता 12 फूट अजगर; महिला अंघोळीसाठी जाताच...; Watch Video

बापरे! बाथटबमध्ये होता 12 फूट अजगर; महिला अंघोळीसाठी जाताच...; Watch Video

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Shutterstock)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Shutterstock)

महिलेच्या बेडरूममच्या बाथरूममध्ये एक अवाढव्य अजगर घुसला होता. बाथटबजवळ हा अजगर होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Priya Lad

बँकॉक, 09 सप्टेंबर : टॉयलेटमध्ये साप लपून बसला आणि त्याने हल्ला केला अशी काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. साप म्हटलं तरी अनेकांना दरदरून घाम फुटतो. विचार करा या सापाच्या जागी अवाढव्य अजगर असेल तर...  असंच एक प्रकरण समोर आलं आहे टॉयलेट नव्हे तर बाथरूमच्या बाथटबमध्ये एक अवाढव्य अजगर लपून बसला होता. अजगर असलेल्या याच बाथरूममध्ये एक महिला अंघोळीसाठी गेली. थायलँडमधील ही घटना आहे.

थायलँडमध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या घरात अजगर घुसला. ही महिला आपल्या बेडरूमच्या बाथरूममध्ये गेली. तेव्हा बाथटबच्या खालून तिला अजगर येताना दिसला. तिला धडकीच भरली. तब्बल 12 फूट लांबीचा हा अजगर.  तिथंच जवळ महिलेच्या पाळीव मांजरी होत्या. या मांजरींना खाण्याचा प्रयत्न तो करत होता. महिला घाबरली. तिने लगेच वनविभागाला फोन केला. वनविभागाची टीम तिथं आली. बऱ्याच मेहनतीनंतर अजगराला पकडण्यात टीमला यश मिळालं.

हे वाचा - Viral video : महिलेच्या कानात शिरला साप, पिवळ्या सापाचा व्हिडीओ पाहून सर्वच हैराण

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 9 सप्टेंबर रोजी @nowthisnews इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पण ही घटना नेमकी कधीची आहे ते माहिती नाही. या व्हिडीओत तसं काही सांगण्यात आलं नाही.

View this post on Instagram

A post shared by NowThis (@nowthisnews)

व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने मी टॉयलेटमधील सापांच्या घटनांबाबत ऐकलं आहे पण हे काही वेगळंच आहे. महिलेने जे केलं ते मी नाही करू शकत, अशी कमेंट केली आहे. तर एका युझरने नवं भय इतकंच म्हटलं आहे.

हे वाचा - बाबो! एका नागिणीसाठी आपसात भिडले 2 विषारी साप; शेवट असा झाला की... Watch Video

बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये अजगर दिसण्याची ही पहिली घटना नाही. याआधीही अशा काही घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी इंग्लंडच्या स्टॉरब्रिजमध्ये राहणाऱ्या लॉराला पहाटे पाचच्या दरम्यान टॉयलेटमध्ये एक भलंमोठं अजगर बसल्याचं दिसलं. अजगराला पाहून लॉरा कमालीची घाबरली आणि आरडाओरडा करत बाहेर पळाली. बाहेर तिचे मित्र होते. रात्रभर पार्टी झाल्यामुळे अल्कोहोलच्या प्रभाव असावा आणि त्यामुळेच लॉराला अजगराचा भास झाला असावा, असं तिच्या मित्रांना वाटलं. मग तिच्या मित्रांनी या बाबीची खातरजमा करण्याचं ठऱवलं. ते टॉयलेटपाशी गेले आणि आत डोकावून पाहिलं. आतमध्ये खरोखरच मोठं अजगर होतं. लॉराचा भाऊ सर्पमित्र असल्यामुळे तिने त्याला बोलावून घेतलं. सर्पमित्राने अजगराला अलगद पकडलं आणि पिशवीत बंद केलं. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

First published:

Tags: Python, Python snake, Snake, Viral, Viral videos