Home /News /videsh /

TIME नियकालिकाच्या मुखपृष्ठावर जेलेन्स्की यांचा फोटो, काय आहे युक्रेनी अध्यक्षांचा प्लॅन?

TIME नियकालिकाच्या मुखपृष्ठावर जेलेन्स्की यांचा फोटो, काय आहे युक्रेनी अध्यक्षांचा प्लॅन?

Russia Ukraine War: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांना प्रतिष्ठित टाईम मासिकाने कव्हर पेजवर स्थान दिले आहे. मासिकाच्या मुखपृष्ठावर जेलेन्स्की यांचे कृष्णधवल छायाचित्र छापले आहे. चित्रासोबत 'हाऊ जेलेन्स्की लीड्स: इनसाइड कंपाउंड विथ द प्रेसिडेंट अँड हिज टीम' असे चित्र होते.

पुढे वाचा ...
    वॉशिंग्टन, 30 एप्रिल : युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाला दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. या लढ्याने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळवून दिली आहे. रशियासारख्या बलाढ्य देशांशी युद्ध केल्यामुळे जेलेन्स्कींना प्रतिष्ठित टाईम नियतकालिकाच्या मुखपृष्ठावरही स्थान मिळालं आहे. नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांचा एक ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो आहे, ज्यामध्ये त्यांनी एका बाजूने पोज दिली आहे. या छायाचित्रासोबत 'हाऊ जेलेन्स्की लीड्स: इनसाइड कंपाउंड विथ द प्रेसिडेंट अँड हिज टीम' असं लिहिलं आहे. टाईम मॅगझिनचे रिपोर्टर सायमन शूस्टर यांनी कव्हर केलेली स्टोरी वाचकांना युक्रेनचे अध्यक्ष जेलेन्स्की आणि त्यांनी कठीण काळात देशाचं नेतृत्व कसं केलं याबद्दल सांगते. जेलेन्स्की यांनी नियतकालिकाला सांगितलं की, 'जगाचं लक्ष आपल्याकडे वेधलं जाणं हे आपल्याला रशियन बॉम्बच्या वर्षावाइतकंच त्रासदायक वाटतं.' लोक ही लढाई इन्स्टाग्रामवर, सोशल मीडियावर पाहतात, जेव्हा ते कंटाळतात, तेव्हा ते स्क्रोल करून पुढे निघून जातात. 24 फेब्रुवारीला युद्ध सुरू झालं या वर्षी 24 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धाच्या सुरुवातीच्या आठवड्यांत जेलेन्स्की सूर्योदयाच्या वेळी किंवा काही वेळा त्याआधीही त्यांच्या जनरल्सकडे परिस्थितीचा अहवाल मागवत असत. नंतर त्यांनी त्यांची नाश्त्याची वेळही आणखी काही तासांनी पुढे वाढवली. हे वाचा - रशियाने डॉल्फिन्सना दिलं खास प्रशिक्षण, अशा प्रकारे करताय नौदलाचं संरक्षण जेलेन्स्की विध्वंस पाहण्यासाठी बाहेर आले जेलेन्स्की एकदा गुप्तपणे राष्ट्रपती भवन सोडून कीवचा विध्वंस पाहण्यासाठी बाहेर आले होते, असं या न्यूजमध्ये नमूद केलं आहे. त्यांची मुलाखत घेणारे पत्रकार शूस्टर म्हणाले की, दोन महिन्यांच्या युद्धामुळे युक्रेनचे अध्यक्ष अधिक मजबूत आणि संतप्त झाले आहेत. आता ते जोखीम पत्करण्यास अधिक तयार झाले आहेत. दरम्यान, युक्रेनवर रशियानं आक्रमण केल्यापासून तिसरा महिना सुरू झाला आहे. बहुतेक अहवाल म्हणतात की, रशियन सैन्याला युक्रेनमध्ये मर्यादित यश मिळालं आहे.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Russia Ukraine, Russia's Putin, Ukraine news

    पुढील बातम्या