मॉस्को, 29 एप्रिल : गेल्या दोन महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये (russia ukraine war ) युद्ध सुरू आहे. रशियाने (russia) युक्रेनवर नव्याने हल्ले सुरू केले आहेत. दरम्यान, काही उपग्रह छायाचित्रेही समोर आली आहेत, ज्यामध्ये रशियन नौदलाने आपल्या सुरक्षेसाठी समुद्रातल्या माशांचा वापर केला आहे. काही मासे काळ्या समुद्रात रशियन नौदल तळाचे रक्षण करत आहेत. रशियाने या माशांना विशेष प्रशिक्षण दिलं आहे, जे त्यांना धोका वाटल्यास हल्ला करू शकतात. युक्रेन युद्धादरम्यान रशियाने काळ्या समुद्रातील आपल्या नौदल तळाच्या संरक्षणासाठी प्रशिक्षित डॉल्फिन तैनात केल्याचा दावा USNI न्यूज (United States Naval Institute) ने केला आहे. रशियन नौदलाने सेवास्तोपोल (Sevastopol) बंदराच्या प्रवेशद्वारावर दोन डॉल्फिन पेन ठेवल्या आहेत. या डॉल्फिनना समुद्राच्या पृष्ठभागावर पडलेली कोणतीही वस्तू सापडेल अशा पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आल्याचं संरक्षण तज्ज्ञांचं मत आहे. तसेच ते गुप्तचर मोहिमा पार पाडू शकतात. यूएसएनआय न्यूजच्या वृत्तानुसार, सॅटेलाइट फोटोनुसार हे पेन फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर झालेल्या हल्ल्याच्या वेळी येथे आणण्यात आले होते. सेवस्तोपोल हा काळ्या समुद्रातील रशियन नौदलाचा मुख्य नौदल तळ आहे. शक्यतो या डॉल्फिनना पाण्याखाली प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्यासाठी इथे ठेवण्यात आलं आहे. अमेरिका आणि रशिया अशा प्रकारच्या ऑपरेशन्ससाठी सागरी प्राण्यांना प्रशिक्षण देतात. यामुळे रशियन युद्धनौकांचे नुकसान करण्यासाठी बंदरात घुसखोरी करण्यापासून युक्रेनियन स्पेशल ऑपरेशन्स फोर्सेसना रोखू शकतात. सागरी प्राण्यांशी संबंधित कार्यक्रम शीतयुद्धाच्या काळात सुरू झाला होता शीतयुद्धाच्या काळात, सोव्हिएत नौदलाने काळ्या समुद्रातील डॉल्फिन प्रशिक्षणासह सागरी जीवनाशी संबंधित अनेक कार्यक्रम विकसित केले. ते युनिट सेवास्तोपोलजवळील काझाच्या बुक्ता येथे होते. आजही ते तिथेच आहे. 1991 मध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर हे युनिट युक्रेनियन सैन्याचा भाग बनलं. मात्र, तो चालू ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं आणि अखेर ते थांबलं. (हे वाचा - तुम्ही कधी बसणार का अशा परीक्षेला? चीनमध्ये 9 तासांचा असतो पेपर! ) एक व्हेल मासा रशियाच्या प्रशिक्षण कार्यक्रमातून पळून गेला एप्रिल 2019 मध्ये जेव्हा बेलुगा व्हेल मासा नॉर्वेला पोहोचला, तेव्हा रशियाच्या या प्रकल्पाने जगाचे लक्ष वेधून घेतले. या व्हेल माशाचं नाव हल्दिमीर असे होते. हा व्हेल मासा रशियन नौदलाच्या प्रशिक्षण कार्यक्रमातून निसटला होता. आता रशियाने युद्धग्रस्त सीरियाजवळ आपले डॉल्फिन सैन्य तैनात केले आहे. शत्रू समुद्रातून पाणबुड्यांवर हल्ला करेल अशी भीती रशियाला वाटत आहे. (हे वाचा - विमान अपघाताचं सत्य आलं समोर.. पायलटने कॉकपिटमध्ये पेटवली सिगारेट अन् ) रशिया या प्राण्यांना हेरगिरीचे प्रशिक्षणही देतो रशियाने 2014 मध्ये क्रिमियाला जोडलं, त्यानंतर हे युनिट रशियन नौदलाच्या ताब्यात आलं. यानंतर सागरी जीवसृष्टीचा कार्यक्रम विस्तारला आणि तो पुन्हा सुरू झाला. आर्क्टिक नॉर्थमध्ये, रशियाचा नॉर्दर्न फ्लीट बेलुगा व्हेल आणि सील सारख्या इतर समुद्री जीवांचा वापर करतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.