न्यूयॉर्क, 12 एप्रिल : कोरोनाचा सामना करण्यासाठी जगातील बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुले घरात राहणे, हे कोरोनाशी सामना करण्याचे एकमेव साधन आहे. त्यामुळं घरात राहून तुम्हाला देशसेवा करण्याची संधी. याचबरोबर कोरोनाबाधितांच्या मदतीसाठीही सरकार लोकांना आवाहन करत आहे. अशातच एक अवलियाने घरात बसून 5 कोटींची रक्कम जमा केली. सीन मॅक्लफ्लिन असे या मुलाचे नाव असून. सीन हा प्रसिद्ध युट्युबर आणि गेमर आहे. सीनने 12 तासांत ऑनलाईन चॅरिटीच्या माध्यमातून 5 कोटींची रक्कम जमा केली. कोरोनाशी सामना करण्यासाठी सीनने ही सर्व रक्कम दान केली. इंडिया टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, #HopeFromHome नावाची मोहित सीनने सुरू केली होती. यासंदर्भात त्याने फेसबुक, ट्विटर आणि टीकटॉकवर लोकांना मदतीचे आवाहन केले होते. त्यानंतर जगभरातील लोकांनी त्याच्या या मोहिमेला हातभार लावला. या मोहिमेच्या माध्यमातून सीनने 6 लाख 59 हजार डॉलर म्हणजे जवळजवळ 5 कोटी रक्कम जमा केली. कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी जमा करण्यात आलेली ही रक्कम तिल्टिफाइद्वारे जमा करण्यात आली. वाचा- ‘हे कोणी लिहिलं आहे ते मी शोधणार’, व्हायरल झालेल्या पोस्टवर भडकले रतन टाटा
वाचा- रिपोर्ट निगेटिव्ह असतील तरी निश्चिंत राहू नका, 70% लोकांना पुन्हा होतोय कोरोना सीनने जमा केलेली रक्कम ही विविध संस्थांना दिली आहे. यातील काही रक्कम प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी, काही जागतिक आरोग्य संघटनेला तसेच, कॉमिक रिलीफ युएस यां संघटनेलाही काही रक्कम दान केली आहे. युट्युबवर सीनचे 23 लाख सबस्क्रायबर्स आहे. अशा पद्धतीने निधी जमवण्याची ही सीनची पहिली वेळ नाही. याआधी सीनने ऑस्ट्रेलियात लागलेल्या आगीसाठीही मदतनिधी जमा केला होते. वाचा- कोरोनाच्या लढाईत क्रिकेटवरून वाद, CCTV मध्ये पाहा हेच ते देशाचे विरोधक