वॉशिंग्टन, 11 एप्रिल : कोरोना विषाणू दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत आहे. प्रत्येकवेळी लक्षणे बदलत असल्यामुळे शास्त्रज्ञांना अद्याप यावर लस शोधता आलेली नाही आहे. या सगळ्यात आता नवीन धोका समोर आला आहे. हा धोका आहे फॉल्स निगेटिव्ह रिपोर्टचा. फॉल्स निगेटिव्ह म्हणजे कोरोनाची तपासणी केल्यानंतर रुग्णात कोणतीही लक्षणे दिसत नाही. मात्र काही दिवसानंतर त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात. अशा रूग्णांकडून संसर्ग पसरण्याचा धोका जास्त असतो. शास्त्रज्ञांनी फॉल्स निगेटिव्हचा धोका वाढत असल्याने चिंता व्यक्त केली आहे. शास्त्रज्ञांनी रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या लोकांनाही क्वारंटाइन ठेवण्यास सांगितले आहे. वॉशिंग्टन येथील शास्त्रज्ञांच्या मते, कोरोनाची लक्षणे असतील आणि तरी रिपोर्ट निगेटिव्ह आले असतील तरी, हा धोकाच आहे. त्यामुळे लोकांनी घरातच रहावे. रिपोर्ट निगेटिव्ह असतील तर काही दिवसांनी पुन्हा कोरोनाव्हायरस शरिरात प्रवेश करू शकतो. तुमच्या प्रतिकार शक्तीवर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे", असे सांगितले. कोरोनाव्हायरस गेले चार महिने जगभरात थैमान घालत आहे. शास्त्रज्ञांच्या मते जर 40 लाख लोकांची चाचणी करण्यात आली असेल तर, त्यातील 20 हजार फ्लॉल्स निगेटिव्ह असण्याची शक्यता आहे. अशा लोकांची पुन्हा एकदा तपासणी केला पाहिजे. वाचा- धक्कादायक! कोरोनाची लागण झाल्याच्या भीतीने तरुणाने घेतला गळफास भारतामध्येही समोर आली फॉल्स निगेटिव्हची प्रकरणे आतापर्यंत केरळमध्ये अशी दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यात रुग्णांत प्रथम कोणतीही लक्षणे दिसली नाहीत, परंतु नंतर त्या दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. केरळमधील पठाणमथिट्टा जिल्ह्यात, तिरुवनंतपुरमपासून सुमारे 100 किमी अंतरावर, दोन रुग्ण फॉल्स निगेटिव्ह होते. दोघांमध्येही कोरोना विषाणूची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. जेव्हा त्यांची चाचणी करण्यात आली तेव्हा दोघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, यातील एक दुबईवरून आला होता. तर दुसरी व्यक्ती दिल्लीहून आली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की यापूर्वी दोघांना कोव्हिड-19 ची कोणतीही लक्षणे दाखविली नव्हती. वाचा- कोरोनाच्या लढाईत क्रिकेटवरून वाद, CCTV मध्ये पाहा हेच ते देशाचे विरोधक लवकरच कोरोनावर मिळणार लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीकरणशास्त्र विभागाच्या प्रोफेसर सारा गिलबर्ट यांनी दावा केला आहे की, तिची टीम लवकरच कोरोना विषाणूची लस तयार करेल. सारा यांनी येत्या 15 दिवसांत कोरोना विषाणूची लस चाचणी करणार असल्याचे सांगितले. या लसीबाबत सारा यांना 80 टक्के विश्वास आहे. या चाचणीचा निकाल चांगला आल्यात सरकार यासाठी निश्चितपणे निधी जाहीर करेल, याचीही चिन्हे असल्याचा विश्वास सारा यांनी व्यक्त केला. याआधी अमेरिकेने मानवावर लसीची चाचणी केली होती. मात्र अद्याप या लसीबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. त्यामुळे अमेरिकेआधी ब्रिटनमध्ये ही लस तयार केली जाऊ शकते. वाचा- कोरोनाव्हायरसची लस तयार करण्यासाठी लागणार आणखी 5 महिने, ‘या’ देशाने केला दावा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.