जाहिरात
मराठी बातम्या / देश / कोरोनाच्या लढाईत क्रिकेटवरून वाद, CCTV मध्ये पाहा हेच ते देशाचे विरोधक

कोरोनाच्या लढाईत क्रिकेटवरून वाद, CCTV मध्ये पाहा हेच ते देशाचे विरोधक

कोरोनाच्या लढाईत क्रिकेटवरून वाद, CCTV मध्ये पाहा हेच ते देशाचे विरोधक

कोरोनाच्या लढाईत क्रिकेटवरून वाद, लॉकडाऊनमध्ये दोन गटात हाणामारी.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11 एप्रिल : भारतात कोरोनाव्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 14 एप्रिल रोजी लॉकडाऊनचा कालावधी संपणार आहे. मात्र 30 एप्रिलपर्यंत हा कालावधी आणखी वाढवला जाऊ शकतो, कारण कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहेत. दुसरीकडे लोकं अजूनही लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाही आहेत. दिल्लीमध्ये लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन करत काही मुलं क्रिकेट खेळत होती. या दरम्यान त्यांच्यात वाद झाला. दोन गटांमध्ये झालेल्या या वादात चार जण जखमी झाले आहेत. दिल्ली जवळ असलेल्या छोलस गावात लॉकडाऊनचे उल्लंघन करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले. लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडून क्रिकेट खेळत असताना, दोन गटांमध्ये वाद झाला. स्टम्प आणि बॅटने एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात गावातील महिला प्रधानचाही समावेश होता. या महिला प्रधानसह तीन जण या मारहाणीत जखमी झाले. दरम्यान पोलिसांना याबाबत माहिती कळल्यानंतर संपूर्ण गावावर लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, मारहाणीसंदर्भात पुढील तपास सुरू आहे.

जाहिरात

वाचा- कोरोनाव्हायरसची लस तयार करण्यासाठी लागणार आणखी 5 महिने, ‘या’ देशाने केला दावा कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. मात्र अशा परिस्थितीतही लोकं घराबाहेर पडत आहे. यासाठी पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. देशभरातील विविध ठिकाणी पोलीस ड्रोनच्या माध्यमातून घरातून बाहेर पडणाऱ्यांचा शोध घेत आहेत. त्यानंतर त्यांच्यवर कारवाई केली जात आहे. वाचा- लॉकडाउनमध्ये पडले बाहेर, पोलिसांआधी पोहचला ड्रोन! अशी झाली लोकांची अवस्था WHOने लॉकडाऊनबाबत दिला इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंध हटविण्याबाबत सावध राहण्याचा इशारा दिला आहे. WHOचे महासंचालक टेड्रॉस अ‍ॅडॅनॉम घेब्रेयसिस यांनी लॉकडाऊन हटविण्याबाबत विचार करण्याआधी होणाऱ्या परिणामांचा विचार करा. लॉकडाऊन हटवल्यास कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा दिला. आफ्रिकेतील काही देश लॉकडाऊन हटविण्याबाबत विचार करत आहेत. या देशांना सावध करण्यासाठी टेड्रॉस यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. वाचा- लॉकडाऊनमध्ये गच्चीवर रंगला जुगाराचा डाव, पोलिसांचा ड्रोन आला आणि…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cricket
  • First Published :
जाहिरात
जाहिरात