जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / Youtuber Mr. Beast Challenge : यू-ट्यूबर मिस्टर बीस्टचं अनोखं चॅलेंज पूर्ण करणाऱ्याला मिळाले 4 कोटी रुपये

Youtuber Mr. Beast Challenge : यू-ट्यूबर मिस्टर बीस्टचं अनोखं चॅलेंज पूर्ण करणाऱ्याला मिळाले 4 कोटी रुपये

Youtuber Mr. Beast Challenge : यू-ट्यूबर मिस्टर बीस्टचं अनोखं चॅलेंज पूर्ण करणाऱ्याला मिळाले 4 कोटी रुपये

अमेरिकन यू-ट्यूबर मिस्टर बीस्ट दर वेळी युझर्ससाठी अनोखी आव्हानं घेऊन येतो. ती पूर्ण करणाऱ्यांना मोठं बक्षीस देण्यात येतं. (Youtuber Mr. Beast Challenge)

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 28 सप्टेंबर : अमेरिकन यू-ट्यूबर मिस्टर बीस्ट दर वेळी युझर्ससाठी अनोखी आव्हानं घेऊन येतो. ती पूर्ण करणाऱ्यांना मोठं बक्षीस देण्यात येतं. नुकतंच त्यानं त्याचं चॅलेंज पूर्ण करणाऱ्या एका युझरला 4 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं आहे. हे चॅलेंजही अनोखं होतं. त्यात एका व्यक्तीला 100 दिवस निर्मनुष्य जागी असलेल्या एका घरात राहायचं होतं. विशेष म्हणजे तब्बल 3 महिने 10 दिवस एकटं राहण्याचं हे चॅलेंज पूर्ण करणाऱ्याला त्यानं 4 कोटी रुपये दिले आहेत. या चॅलेंजचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ‘आज तक’ने याचं सविस्तर वृत्त दिलं आहे.

    जाहिरात

    अमेरिकन यू-ट्यूबर मिस्टर बीस्टचं यू-ट्यूब चॅनेल खूप लोकप्रिय आहे. यावर मिस्टर बीस्ट वेगवेगळी चॅलेंजेस देत असतो. ती पूर्ण करणाऱ्यांना बक्षिसापोटी चांगली रक्कम मिळते. काही महिन्यांपूर्वी त्याने युझर्सना एक अनोखं चॅलेंज दिलं होतं. त्यात निर्मनुष्य जागी एकट्या व्यक्तीला 100 दिवस राहावं लागणार होतं. त्यासाठी एका मोकळ्या, निर्मनुष्य जागी वर्तुळ आखलं होतं. त्याच्या आत हलविता येणारं घरं होतं. घरात खाण्यापिण्याचे सर्व पदार्थ व गरजेच्या वस्तू होत्या. कपडे व इतर गोष्टीही होत्या; मात्र त्या वर्तुळात एका व्यक्तीनं 100 दिवस एकटं राहायचं होतं.

    हे ही वाचा :  आकाशात उडता उडता एकमेकांत अडकली 2 विमानं आणि…, भयंकर दृश्य कॅमेऱ्यात कैद; Watch Video

    शॉन नावाच्या एका सबस्क्रायबरने हे चॅलेंज स्वीकारलं. कुटुंबाचा निरोप घेऊन त्यानं हे टास्क सुरू केलं. शॉन काय करतो आहे हे रेकॉर्ड करण्यासाठी घराच्या वेगवेगळ्या भागांत कॅमेरे लावण्यात आले होते. घरात उपलब्ध सामग्रीतच त्याला 100 दिवस काढायचे होते. शिवाय घरातली कामंही स्वतःच करायची होती. त्यादरम्यान त्याला सहजासहजी बक्षीस मिळू नये यासाठी काही आव्हानं तयार करण्यात आली होती. काही वेळा मिस्टर बीस्टने त्याला पैशांचं आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला; मात्र शॉन शेवटपर्यंत बधला नाही. हे चॅलेंज त्यानं यशस्वीरीत्या पूर्ण केलं.

    जाहिरात

    मिस्टर बीस्टच्या यू-ट्यूब चॅनलचे 105 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. दर वेळी त्याच्या चॅलेंजेसचे व्हिडिओ व्हायरल होतात. आताही 100 दिवस एकटं राहण्याच्या चॅलेंजचा व्हिडिओ भरपूर व्हायरल होतोय. मिस्टर बीस्टने त्याच्या यू-ट्यूब चॅनेलवर तो शेअर केलाय. आतापर्यंत या व्हिडिओला 2 कोटी 70 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. हे चॅलेंज पूर्ण करणाऱ्याला मिस्टर बीस्टने 4 कोटी रुपये दिले आहेत. या व्हिडिओवर प्रेक्षकांनी भरपूर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यांनी शॉनचं तोंडभरून कौतुक केलंय.

    जाहिरात

    हे ही वाचा :  बड्या नेत्यांना घेऊन जाणारं Helicopter Crash, विजेच्या तारेचा स्पर्श होताच…; अंगावर काटा आणणारा Video

    शॉनने इतकं सहन केलंय, की यापेक्षा जास्त रक्कम त्याला मिळायला हवी, असं एका युझरनं लिहिलंय. शॉन खरा लीजंड असल्याचं दुसऱ्या एका युझरने म्हटलंय. शॉन बक्षिसाच्या रकमेसाठी खरोखर पात्र असून, आपल्याला त्याबद्दल आनंद झाल्याचं तिसऱ्या युझरने म्हटलंय.

    जाहिरात
    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात