मराठी बातम्या /बातम्या /विदेश /इकडे माशा, तिकडे मासे! मधमाशांपासून वाचण्यासाठी पाण्यात उडी, माशांच्या हल्ल्यात मृत्यू

इकडे माशा, तिकडे मासे! मधमाशांपासून वाचण्यासाठी पाण्यात उडी, माशांच्या हल्ल्यात मृत्यू

मधमाशांनी केलेल्या हल्ल्यातून (Youth jumped into lake and attacked by fish to kill one) वाचण्यासाठी तरुणांनी पाण्यात उडी घेतली, पण माशांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

मधमाशांनी केलेल्या हल्ल्यातून (Youth jumped into lake and attacked by fish to kill one) वाचण्यासाठी तरुणांनी पाण्यात उडी घेतली, पण माशांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

मधमाशांनी केलेल्या हल्ल्यातून (Youth jumped into lake and attacked by fish to kill one) वाचण्यासाठी तरुणांनी पाण्यात उडी घेतली, पण माशांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

ब्राझिलिया, 15 नोव्हेंबर: मधमाशांनी केलेल्या हल्ल्यातून (Youth jumped into lake and attacked by fish to kill one) वाचण्यासाठी तरुणांनी पाण्यात उडी घेतली, पण माशांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मासे पकडण्यासाठी जलाशयापाशी गेलेल्या तरुणांना (Jumped into water to get rid of honey bee attack) मधमाशांचं पोळं उठल्यामुळे काय करावं ते समजत नव्हतं. मधमाशांच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी त्यांनी पाण्यात उड्या मारल्या. मात्र पाण्यातील माशांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

अशी घडली घटना

ब्राझीलमधील Minas Gerais भागातील एका तळ्यावर मासेमारी करण्यासाठी तीन मित्र गेले होते. यावेळी मधमाशांचं पोळं उठलं आणि माशांनी दिसेल त्याच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तिघांनीही तळ्यात उड्या मारल्या. मात्र तळ्यात मृत्यू त्यांची वाट पाहत होता.

माशांनी केला हल्ला

पाण्यात उडी घेताच माशांनी तिघांवर हल्ला चढवला. माशांचा हल्ला परतवून लावत तिघांपैकी दोघे पुन्हा पाण्याबाहेर आले, मात्र एकाला माशांच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला. माशांच्या जोरदार हल्ल्यामुळे तो तरुण पाण्यातून बाहेरच येऊ शकला नाही. माशांनी त्याच्या शरीराचे चावे घेतले आणि त्याच्या अनेक अवयववांवर एकाच वेळी जोरदार हल्ला चढवला. त्यामुळे हा तरुण पोहत तळ्याच्या बाहेर येऊच शकला नाही. जे दोन मित्र बाहेर आले, तेदेखील जखमी झाले होते आणि कमालीचे घाबरले होते. त्यामुळे ते तिसऱ्या मदतीला जाण्याची शक्यता नव्हती.

हे वाचा- सणकी विकृत! Google वर सर्च केले खुनाचे प्रकार, मोबाईल पाहून पोलिसही चक्रावले

दुसऱ्या दिवशी सापडले तुकडे

दुसऱ्या दिवशी पाण्यात शोध घेतला असता तरुणाच्या शरीराचे काही तुकडे पाण्यात सापडले. माशांनी तरुणाला खाऊन टाकलं होतं आणि त्याच्या शरीराचे तुकडेच केवळ पाण्यात उरले होते. या मृत्यूमागे कुठलाही घातपात नसून माशांच्या हल्ल्यातच तरुणाचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टेम अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या घटनेनं सर्वांना जबर धक्का बसला आहे.

First published:
top videos

    Tags: Attack, Death, Fish