Home /News /videsh /

तरुणीने असे कपडे घातले की 4 पटीने वाढली दुकानाची विक्री, पोलिसांची झाली एन्ट्री!

तरुणीने असे कपडे घातले की 4 पटीने वाढली दुकानाची विक्री, पोलिसांची झाली एन्ट्री!

या सर्व प्रकारात पोलिसांची एन्ट्री झाल्यामुळे तरुणीला धक्काच बसला

    थायलँड, 27 नोव्हेंबर : कमी कपड्यावरुन लोक कमेंट्स करीत असल्याचं तुम्ही पाहिलं असेल, मात्र कमी येथे लो कट टॉप (Cut Top) घातल्यामुळे पोलिसांनी चौकशी केल्याचं कधी ऐकलं आहे का? थायलँडमध्ये (Thailand News) 23 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीसह अशीच काहीशी घटना घडली आहे. (young woman wore such clothes that the sales of the shop increased 4 times the police made an entry) ओलिव अरन्या अपाइसो एक नर्सिंगची विद्यार्थिनी आहे. ती चियांग माईमध्ये पॅनकेक सेलर (Pancake Seller) आहे. तिने सांगितलं की, मी माझ्या मैत्रिणीकडून टॉप घेतला होता. तेव्हा तिने हा टॉप घातला नव्हता, तेव्हा ती दिवसभरात तब्बल 30 बॉस्कची विक्री करीत होती. मात्र जेव्हा हा टॉप घालून दुकानावर पोहोचली तर चित्र पालटलं. लोक कट टॉप घातल्यामुळे विक्री चौपट वाढली... पॅनकेक स्टॉलवर टॉप घालून पोहोचल्यानंतर तरुणीची विक्री चौपट झाली. स्थानिक लोकांनी क्रेप्स खरेदी करण्यासाठी लाइन लावली आणि सेल्फीसाठी पोज दिली. यादरम्यान काहींनी याबाबत पोलिसात तक्रार केली. लोकांनी सांगितलं की, जी जे कपडे घालून आली होती, ते योग्य नव्हते. तक्रार केल्यानंतर थेट पोलीस अधिकारीच स्टॉलवर पोहोचले. पोलिसांनी ओलिवला दिला इशारा... पोलिसांनी ओलिवला पोलीस ठाण्यात नेलं आणि तिला इशारा दिला. पोलिसांनी तरुणीला सांगितलं की, शहरातील कल्चरचा सन्मान करा. जेव्हा ओलिव परत आली तर तिने रडत रडत सांगितलं की, मला पैशांची गरज आहे. मी स्वत:साठी हे सर्व करीत होती. यात काय चूक? दुकान उघडण्यापूर्वी ग्राहक रांग लावून उभं राहतात. काहीजणं माझ्यासोबत उभं राहून फोटोही काढतात आणि फोटो ऑनलाइन शेअर करतात. ज्यामुळे माझा स्टॉल अधिक प्रसिद्ध होत आहे. हे ही वाचा-अमेरिकी बापलेकाचे बादशहाच्या गाण्यावर ठुमके, VIDEO पाहून चाहते म्हणाले ONCE MORE ओलिवने सांगितलं की, मला शॉप सुरू करून तब्बल तीन महिले झाले आहेत. मात्र आता तर मी दिवसात 100 पॅनकेक विकत आहे. तिने आपल्या टॉपवरुन कोणालाही त्रास दिला नाही, आणि कोणाला त्रास झाला असेल तर मला माफ करा. टॉप घसरू नये म्हणून तिने टॉपवर टेपदेखील लावला होता. यानंतर मी विविध प्रकारचे अंग झाकणारे कपडे घालेन.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Police, Thailand

    पुढील बातम्या