न्यूयॉर्क, 26 नोव्हेंबर: भारतातील म्युझिक स्टार बादशहाच्या (Viral video of father and son) गाण्यावर अमेरिकेतील एक बापलेक थिरकत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. डान्स करणं हा अनेकांचा छंद असतो. त्या त्या काळात (Hobby of people) प्रसिद्ध असणारे डान्स आणि गाणी हे तरुणांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात. मनी हाईस्ट ही वेब सीरिज प्रसिद्ध झाल्यानंतर ज्याप्रमाणं भारतात ‘बेला सियाओ’ हे गाणं लोकप्रिय झालं होतं, त्याचप्रमाणं बादशहाचं जुगनू हे गाणं सध्या अमेरिकेत जोरदार व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल अमेरिकेत बापलेक एका गाण्यावर थिरकत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. डान्सिंग डॅड नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली ही जोडी जुगनू गाण्यावर थिरकताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. व्यावसायिक कलाकारही फिके वाटावेत, असं कसब या डान्स करणाऱ्या बापलेकाकडं असल्याचं हा व्हिडिओ पाहून समजतं.
व्हिडिओ होतोय व्हायरल या व्हिडिओला आतापर्यंत 38 लाख व्ह्यूज मिळाले असून 3 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी त्याला लाईक केलं आहे. दिवसेंदिवस हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत असून त्यावर युजर्स कौतुकाचा अक्षरशः वर्षाव करत आहेत. भारतातील गाणं अमेरिकेत प्रसिद्ध कलेला कुठलीही भौगोलिक सीमा नसते, हेच या निमित्तानं दिसून आलं आहे. देशांच्या, भाषेच्या आणि प्रांताच्या सीमा ओलांडून कुठलीही कला प्रत्येकाच्या मनात कसं घर करते, ते यातून दिसून आलं आहे. अमेरिकेत भारतीय गाणी लोकप्रिय होणं ही नवी बाब नसली तरी अशा प्रकारच्या गाण्यांवर टिकटॉक व्हिडिओ तयार होणं आणि त्याला जगभरातील रसिकांची पसंती मिळणं, ही नवी गोष्ट असल्याचं नेटिझन्स सांगतात. युजर्सनी अनेक नव्या गाण्यांचे पर्याय या बापलेकाला सुचवले असून त्यावरही सादरीकरण करण्याची विनंती केली आहे.