मितकिना, 10 मार्च: भारताच्या शेजारील राष्ट्र म्यानमारमध्ये लष्करशाहीने (Army Rule) लोकशाहीचा (Democracy) गळा घोटला आहे. गेल्या महिन्यात येथील लष्कराने निवडणूक प्रक्रियेतून निवडून आलेलं सरकार उलथून लावत याठिकाणी लष्करी सत्ता अंमलात आणली आहे. यामुळे गेल्या एक महिन्यांपासून येथील लोकं रस्त्यावर उतरून लष्कराच्या विरोधात आंदोलन (Protest In Myanmar) करीत आहेत. तर येथील लष्करही आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सर्व प्रयत्न करीत आहे. आतापर्यत या देशात लष्कारने हिंसाचाराचा (Violence in Myanmar) अवलंब करत अनेक अंदोलकांना ठार केलं आहे.
त्यामुळे म्यानमारमध्ये सामान्य नागरिकांना जीव मुठीत घेवून जगावं लागत आहे. येथील लष्कराच्या जवानांनी जागोजागी आपले ठाण मांडले आहेत, तर नागरिकांची पुरती नाकाबंदी सुरू केली आहे. या दडपशाहीच्या जोरावर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना आणि आंदोलकांना तुरुंगात डांबल आहे. याच पार्श्वभूमीवर म्यानमारमधील लष्कराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे, ज्यामध्ये एक नन लष्कराच्या काही (Nun Viral Video) जवानांसमोर गुडघे टेकून बसली असून निष्पाप लोकांना न मारण्याची विनंती करीत आहे. तिचा हा व्हिडिओ आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलाच व्हायरल होतं आहे.
हे ही वाचा- म्यानमारमध्ये आंदोलन धगधगतयं; बचावासाठी नागरिकांची भारतात घुसखोरी
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना म्यानमारच्या मितकिना येथील आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक नन लष्कराच्या जवानांसमोर गुडघ्यावर बसली असून ती लष्कराच्या जवानांकडे निष्पाप लोकांना न मारण्याची विनंती करीत आहे. या व्हिडिओतील ननचं नाव सिस्टर एन रोज नू तवांग असं आहे. यावेळी तिने लष्कराच्या जवानांना म्हटलं की, 'हवं तर तर मला मारून टाका, पण या निष्पाप लोकांना काहीही करू नका.'
हे ही वाचा- Twitter आणि Instagram वरही बंदी! सत्तापालटानंतर म्यानमारमध्ये दिसतंय वेगळं चित्र
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, सिस्टर एन रोज नू तवांग म्हणाली- 'मी सुरक्षा दलाच्या जवानांना सांगितलं होतं की, या लोकांना ठार करु नका. यांना तुमच्याच परिवाराचा सदस्य समजा. जोपर्यंत सुरक्षा दलाचे जवान निष्पाप लोकांना ठार न मारण्याचे वचन देत नाहीत, तोपर्यंत मी याठिकाणी अशाच अवस्थेत थांबेल असंही त्यांनी सांगितलं आहे. यावेळी लष्कराच्या जवानांनीही संबंधित नन च्यासमोर गुडघे टेकवले आणि लोकांना न मारण्याचं आश्वासन दिलं. तसेच आम्ही याठिकाणी केवळ लोकांना हटवायला आलो आहोत, असंही लष्कराच्या जवानांनी सांगितलं. आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.