यंगून, 06 फेब्रुवारी: गेल्या आठवड्यात म्यानमारमध्ये (Myanmar) सत्तापालट झाला आहे. त्याठिकाणच्या प्रभारी लष्कराने (Army) सत्तेची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. त्याचबरोबर म्यानमारमध्ये एका वर्षासाठी आणीबाणी (Emergency) जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता म्यानमारमधील सरकारने इंटरनेट (Internet) आणि सोशल मीडियावर (Social media) बंधणे घालायला सुरुवात केली आहे. लष्कराच्या सरकारने शुक्रवारी फेसबुकसहीत (Facebook) अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी (Social media Ban) घातली आहे. याशिवाय दूरसंचार आणि इंटरनेट सेवा देणाऱ्या संस्थांना ट्विटर (Twitter) आणि इन्स्टाग्रामवर (Instagram) बंधणं घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याठिकाणी नागरीकांनी लष्करी दडपशाहीची निंदा केली आहे. या निषेर्धात देशातील सर्वात मोठ्या शहरात नागरीकांनी प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि भांडी वाजवून सरकारविरोधात निषेध नोंदवला आहे. (हे वाचा- ब्युटीसलून चालवायची गँगस्टरची प्रेयसी; पोलिसांच्या छापेमारी धक्कादायक बाब उघड ) असं म्हटलं जात आहे की, बनावट बातम्या प्रसारित करण्यासाठी लोकं सोशल मीडियाचा दुरुपयोग करत आहेत, याची पुष्टी ‘नेटब्लॉक्स’ या संस्थेनं केली आहे. नेटब्लॉक्स ही सोशल मीडियावर येणारी निर्बंध आणि बंदी यावर नजर ठेवून असलेली संस्था आहे. फेसबुकवरील हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे म्यानमारमध्ये इंटरनेट सेवा देणाऱ्या नॉर्वेच्या टेलीनॉर कंपनीने सांगितलं की, लष्करी सरकारने दिलेल्या आदेशाचं पालन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर सरकारच्या आदेशाच्या आवश्यकतेबाबत प्रश्नही उपस्थित केला आहे. सध्या देशासत सरकारी मीडिया आणि देशातील मुख्य वृत्तपत्रचं माहितीची साधणं राहिली आहेत. तर फेसबुकवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. फेसबुकचा वापर आंदोलने आयोजित करण्यासाठी केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.