Home /News /videsh /

लॉकडाऊन हटवताच वुहानमध्ये लगीनघाई, Matrimonial Website झाली क्रॅश

लॉकडाऊन हटवताच वुहानमध्ये लगीनघाई, Matrimonial Website झाली क्रॅश

वुहानमधील अनेक भागांमध्ये प्री-वेडिंग फोटोशूट सुरू असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली जात आहे

    वुहान, 10 एप्रिल :  चीनमधील (China)  वुहान (Wuhan) मध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन लागू होता. लॉकडाउन (Lockdown) नंतर आता तेथील नागरिकांचं जीवन पूर्वपदावर येत आहे. बाजारांमधील रस्त्यांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यातच वुहानमधील लोकांमध्ये लगीनघाईदेखील पाहायला मिळत आहे. लग्नासाठी लॉनलाइन नोंदणी करण्यात 300 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे मेट्रीमोनिअल वेबसाईट काही काळासाठी क्रॅश झाली होती. चायना पोस्टच्या रिपोर्यनुसार चीनमध्ये सर्वाधिक वापर केल्या जाणाऱ्या पेमेंट प्लॅटफॉर्म अलीपे  (Alipay) यांनी सांगितल्यानुसार लॉकडाऊन उठताच लग्नासाठी ऑनलाइन नोंदणीत 300 टक्के वाढ झाली आहे. यामुळे काही काळासाठी वेबसाइट क्रॅश झाली होती. वधुवरांच सुरू आहे फोटोशूट चीनमधील वुहानमध्ये कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावामुळे मॅट्रिमोनिअल साईट फेब्रुवारी आणि मार्चमध्ये लग्नाच्या नोंदणीसाठी बंद करण्यात आले होते. वुहानमध्ये तब्बल 76 दिवसांनंतर लॉकडाऊन हटविण्यात आला. लॉकडाऊन हटवतान लोकांनी आनंद व्यक्त केला आणि अनेक शहरांमध्ये प्री-वेडिंग शूट सुरू असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी यादरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक निर्बंध घालण्यात आले आहेत. जोडपी विविध ठिकाणी जाऊन फोटोशूट करीत आहेत. वुहानमधील 70 भाग कोरोनामुक्त वुहानमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की 7000 नागरिकांच्या शहरातील 70 भागांंना कोरोनामुक्त घोषित करण्यात आले आहे. असे असले तरी सरकारकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोना पुन्हा बळावू नये यासाठी नागरिकांकडूनही काळजी घेतली जात आहे. संबंधित - कोरोनाचा धोका वाढला, मुंबईत दिवसभरात 10 दगावले, रुग्णांनी हजाराचा टप्पा ओलांडला Coronavirus Update : 24 तासात 37 मृत्यू, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 6761 वर संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: China, Wuhan

    पुढील बातम्या