जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / आजीबाई जोरात कोरोनाच गेला कोमात! 116 वर्षांच्या महिलेनं 3 आठवड्यात केली Covid वर मात

आजीबाई जोरात कोरोनाच गेला कोमात! 116 वर्षांच्या महिलेनं 3 आठवड्यात केली Covid वर मात

आजीबाई जोरात कोरोनाच गेला कोमात! 116 वर्षांच्या महिलेनं 3 आठवड्यात केली Covid वर मात

एका आजीबाईंनी विक्रम केला आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या वयोवृद्ध व्यक्ती असलेल्या या आजींनी वयाच्या 116 व्या वर्षी कोरोनावर मात केली असून, त्या आपला 117वा वाढदिवस साजरा करायला झोकात तयारही झाल्यात

  • -MIN READ
  • Last Updated :

पॅरिस, 11 फेब्रुवारी,- जगभरात कोरोनाचं (Covid-19)संकट अजूनही आहे. अनेक देशांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. सर्वांत जास्त धोका वयोवृद्ध नागरिकांना असून, मृत्यू झालेल्या नागरिकांमध्ये सर्वांत जास्त वृद्धांचा समावेश आहे. फ्रान्समधील एका आजीबाईंनी मात्र विक्रम केला आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या वयोवृद्ध (world’s second-oldest person) व्यक्ती असलेल्या या आजींनी वयाच्या 116 व्या वर्षी कोरोनावर मात केली असून, आज त्या आपला 117वा वाढदिवस साजरा करणार आहेत.

सिस्टर आंद्रे (Sister Andre) असं या आजींचं नाव असून, कोरोनावर मात करणाऱ्या त्या सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती ठरल्या आहेत. 110 किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांची नोंदणी करणाऱ्या जेरंटोलॉजी रिसर्च ग्रुपच्या (Gerontology Research Group) नोंदीनुसार सिस्टर आंद्रे या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वांत वृद्ध व्यक्ती आहेत. फ्रान्सच्या माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, जानेवारीच्या मध्यात सिस्टर आंद्रे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. फ्रान्सच्या तौलोन शहराच्या त्या रहिवासी असून, अवघ्या तीन आठवड्यांमध्ये त्यानी कोरोनावर मात केली आहे. वर-मॅटिन ( Var-Matin) या फ्रेंच वृत्तपत्राला  दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘मला कोरोना झाल्याचं मला जाणवलंदेखील नाही,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. हे वाचा - खरंच मोदी सरकार 4000-6000 रुपयांना कोरोना लस विकतंय? सिस्टर आंद्रे या पूर्णपणे अंध असून, त्या आपल्या व्हीलचेअरच्या साहाय्याने सर्व कामं करतात. हेल्थ केअर युनिटमध्ये उपचारादरम्यान त्या खूपच सकारात्मक असल्याचं तेथील कम्युनिकेशन मॅनेजर डेव्हिड तवेला यांनी सांगितलं. त्यांच्या प्रकृतीविषयीदेखील त्यांनी मला कधीही विचारलं नसल्याचं डेव्हिड यांनी सांगितलं. जेवण किंवा झोपेच्या वेळेचे वेळापत्रक बदललं की नाही हे जाणून घेण्यात त्यांना रस होता. याचबरोबर या आजाराबद्दल कोणतीही भीती त्यांनी दाखविली नाही. महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूच्या रुग्णांविषयी त्या सतत विचारपूस करत असत. त्यांच्याविषयी त्यांना खूप सहानुभूती असे. हे वाचा - तब्बल 9 महिने दिली झुंज; अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरडीनं अखेर कोरोनाला हरवलंच दरम्यान, वर-मॅटिनमध्ये आलेल्या वृत्तानुसार आंद्रे यांच्याप्रमाणे या हेल्थ केअर युनिटमधील इतर सदस्य नशीबवान नव्हते. याठिकाणी असणाऱ्या 88 पैकी 81 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यामधील 10 जणांचा मृत्यू झाला होता. या आजी पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्या असून, आता सार्वजनिक ठिकाणी प्रवास करू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात