नवी दिल्ली, 16 जून : श्रीलंकेत (Sri-lanka News) गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत बिकट परिस्थिती आहे. खाण्या-पिण्याच्या वस्तूंपासून पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमती खूप वाढल्या आहेत. सध्या श्रीलंकेतील नागरिकांसाठी पुरेसं इंधन उपलब्ध नाही. ज्या पेट्रोल पंपावर तेल आहे, तेथेही लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या रांगेत उभं राहून लोकांना इंधन घेण्यासाठी अनेक तास वाट पाहावी लागत आहे.
दुसरीकडे कोलंबोमध्ये पेट्रोल पंपावर लाइनमध्ये उभ्या असलेल्या ऑटो रिक्षा (Heart Attack) चालकाचा मृत्यू झाला आहे. 53 वर्षीय चालकाचा हार्ट अटॅकमध्ये मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ऑटो चालक बुधवारी रात्री कोलंबो दक्षिण उपनगर पनादूरामध्ये इंधनासाठी रांगेत उभे होते. ऑटोमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
यापूर्वी घडली अशी घटना...
यापूर्वीही इंधनासाठी रागेत उभ्या असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वयंपाक घराच्या सिलिंडरसाठी रांगेत उभ्या असलेल्या 64 वर्षीय एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
गेल्या महिन्यात श्रीलंकेत जाळपोळ..
श्रीलंकेतील (Sri Lanka) अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीमुळे गेल्याच महिन्यात येथे सिव्हिल वॉरची परिस्थिती निर्माण झाली होती. पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Prime Minister Mahinda Rajapaksa) यांनी विरोधकांच्या दबावाखाली राजीनामा दिला. त्यानंतर सर्वत्र हिंसक घटना घडल्या. राजपक्षे कुटुंबीयांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये रस्त्यावर रक्तरंजित चकमकी सुरू होती. सरकार समर्थकांच्या हिंसाचारात खासदारासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.